Latur news: शिक्षकाची भूमिका ही विद्यार्थ्याच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. अनेक शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये अनेकदा एक भावनिक नाते निर्माण होते. लातूर (Latur) जिल्ह्यातील शिक्षकांना निरोप देताना असाच काहीसा प्रकार घडला. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नोकरी करणाऱ्या दोन शिक्षकांची नियमांप्रमाणे 13 वर्षांनी बदली झाली. यावेळी या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण गाव भावनिक झाले होते.


लातूर जिल्ह्यातील भवानीनगर तांडा वरील विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ यांचं नातेसंबंध दाखवणारा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकूणच जिल्हा परिषदेच्या शाळेतील  व्यवस्थेवर कायमच टीकाटिप्पणी होत असते. मोडकळीस आलेल्या इमारती, सोयी सुविधेचा अभाव असलेली शाळा, विद्यादान सोडून इतर कामात व्यस्त असलेली शिक्षक अशा पद्धतीचे जिल्हा परिषद शाळेचे चित्र आतापर्यंत उभे राहिले आहे. मात्र या समजूतीस छेद देणारा प्रसंग लातूरमधील भवानीनगर तांडा पाहायला मिळत आहे.


मागील तेरा वर्षापासून भवानीनगर तांडाच्या जिल्हा परिषद शाळेत नरसिंग सुरेकर व बालाजी पुल्लेवाड हे दोन शिक्षक कार्यरत होते.  मागील तेरा वर्षात भवानीनगर तांडा येथील प्रत्येक कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते तयार झाले. विद्यार्थ्यांबरोबर या दोन शिक्षकांचे एक भावनिक नाते तयार झाले होते. मात्र तेरा वर्षे एकाच शाळेत नोकरी केल्यानंतर त्यांना नियमानुसार बदलीचे आदेश आले.परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या लाडक्या शिक्षकांना निरोप देताना अश्रू अनावर झाले. 


संपूर्ण गावाला अश्रू अनावर


दोन शिक्षकांची बदली होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडेच साकडं घातलं. परंतु या दोन शिक्षकांची बदली होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच होतं.  मात्र नियमानुसार बदली झाल्यामुळे शिक्षकांनी त्यांची आवराआवर करायला घेतली. यावेळी फक्त विद्यार्थीच नाही तर संपूर्ण गाव या शिक्षकांसाठी रडत होतं. विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत या शिक्षकांना निरोप दिला. मुलं तर चक्क शिक्षकांना बिलगून रडत होती. त्यांच्या विद्यार्थ्यांचे आणि गावकऱ्यांचे प्रेम पाहून शिक्षकांनाही अश्रू अनावर झाले. या सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेरात कैद झाला आहे. यावेळी शाळेपासून गावाच्या वेशी पर्यंत विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत शिक्षकांना निरोप दिला


लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुका हा डोंगराळ भागात आहे. येथे ठिकठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यातच या शिक्षकांची नियुक्ती भवानीनगर तांड्या वरील शाळेत झाली होती. हे दोन शिक्षक येथे रुजू झाले होते त्यावेळी शाळेची इमारत मोडकळीस आली होती. इथल्या विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना  शाळेबद्दल देखील आस्था नव्हती. त्यानंतर या दोन शिक्षकांनी येथील सर्व परिस्थिती बदलून टाकली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mumbai Pune Express Highway Accident : कुठे पाणी, कुठे बिस्किटं; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अडकलेल्या प्रवाशांसाठी गावकरी ठरले देवदूत