Mumbai Pune Express Highway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातानंतर खोळंबलेली वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तब्बल पाच तास सुरू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन संपलं आहे. जळून खाक झालेला टँकर हटविण्यात यश आलं आहे. मात्र यावेळी प्रवाशांना गावकऱ्यांनी मदत केली. तब्बल चार तास प्रवासी अडकले असताना स्थानिकांनी बिस्किटं आणि पाण्याचं वाटप केलं. त्यामुळे एक्सप्रेसवेवर माणुसकीचं दर्शन झालं. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात रसायनानं भरलेला एक टँकर जळून खाक झाला. या अपघातात होरपळलेल्या चौघांचा मृत्यू झाला असून, दोघं गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातामुळं दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात रसायनानं भरलेला एक टँकर जळून खाक झाला.
मिथेनॉल या रसायनाची वाहतूक करणारा एक टँकर मुंबईच्या दिशेनं जात असताना डिव्हाईडरला धडकून उलटला. त्यानंतर टँकरमधलं मिथेनॉल महामार्गावरच्या पुलावर पसरलं होतं. तेच रसायन पुलाखालून दुचाकीवरून जात असलेल्या तिघांच्या अंगावर पडलं. त्यानंतर काही कळायच्या आत त्या रसायनानं पेट घेतला. या दुर्घटनेत टँकरमधील आणि खालच्या मार्गावरील सहाजण होरपळले. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला तर दोघं जखमी झाले. ही परिस्थिती संध्याकाळपर्यंत नियंत्रणात न आल्यानं अनेक प्रवासी अडकून पडले होते. हजला जाणाऱ्यांची मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी धावपळ सुरू झाली. त्यामुळं देशातील सर्वोत्तम महामार्गावर यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचं चित्र पुन्हा पाहायला मिळालं. पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरच्या या वाहतूक कोंडीत अडकलेल्यांसाठी आसपासच्या गावातील मंडळी देवदूतासारखी धावून आली. स्थानिकांनी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघितल्यानं तिथं माणुसकीचंही दर्शन घडलं.
तब्बल पाच तासांंनी प्रवाशांना दिलासा...
तब्बल साडे पाच तासानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर केमिकल टँकरला आग लागल्यानं अनेक प्रवासी पाच तासंपासून ताटकळत होते . यातच हजला जाणारे मुस्लिम बांधव फसले होते. साताऱ्यातून हे ते सकाळी 8 वाजता निघालेत आणि मुंबईच्या विमानतळावर चार वाजता पोहचायचं होतं. त्यामुळे ते काही दूर बॅग घेऊन चालत निघाले होते. हजला जाण्यासाठी त्यांनी सहा लाख भरले होते. ते पोहचू शकले नाहीत तर हजला जाण्याची आलेली संधी हुकणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
हे ही वाचा...