Latur Crime News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येचे प्रकरण राज्यात गाजत असतात लातूरमध्ये पुन्हा सरपंचाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. यात किरकोळ कारणावरून गावातील दोन तरुणांनी सरपंचाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या शेडोळवाडी येथे ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना सरपंच आणि गावातील दोन तरुणांमध्ये वाद झाला. दरम्यान या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. दरम्यान, यात सरपंचाला गावातीलच दोन तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. दरम्यान मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. तर दुसरीकडे या प्रकरणी तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप सरपंचाकडून करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ, सरपंचाचा आरोप
पुढे आलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे कामकाज सुरू असताना महबूब पठाण हा ग्रामपंचायत मध्ये तक्रार घेऊन आला. यावेळी त्याने घरासमोरील स्ट्रीट पोलमध्ये करंट उतरला आहे, अशी तक्रार केली. यावर उत्तर देताना सदरील तुमची तक्रार महावितरण कार्यालयात जाऊन कळवा, असे सांगितले असता महबूब पठाण आणि अन्य एकाने सरपंचासोबत वाद घातला. दरम्यान हा व्यंग विकोपाला जात यामध्ये सरपंचाला मारहाण करण्यात आली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होतो आहे. या प्रकरणाची तक्रार निलंगा पोलीस ठाण्यात करण्यास गेल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ करण्यात येते आहे , असा आरोप सरपंच शेख यांनी केला आहे.
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. पोलिसांकडून (Beed Police) या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा (Walmik Karad) सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर केज जिल्हा व सत्र न्यायालयात (Kej Court) सुनावणी पार पडणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या