एक्स्प्लोर

पपई पिकातून लाखोंचा नफा, बीडमधील शेतकऱ्याची यशोगाथा

माजलगावच्या निमगावचे प्रयोगशील शेतकरी विकास गायकवाड यांनी दीड एकर पपईतून साडेचार लाखाच्या फळाची विक्री केली.

बीड : पपई हे नाजूक फळ असल्याने अनेक शेतकरी हे पीक घेण्यास धजावत नाहीत. मात्र बीडमधील एका शेतकऱ्यानं पपईच्या पिकातून तब्बल लाखोंचं उत्पादन घेतलं आहे. माजलगावच्या निमगावचे प्रयोगशील शेतकरी विकास गायकवाड यांनी दीड एकर पपईतून साडेचार लाखाच्या फळाची विक्री केली. माजलगाव तालुक्यातल्या हरके निमगावच्या विकास गायकवाड यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये आपल्या दीड एकरावर तैवान जातीच्या पपईची लागवड केली. या दीड एकरामध्ये पंधराशे पपईची झाडं आहेत. दहा रुपये प्रतीरोपाप्रमाणे त्यांना लागवडीसाठी पंधरा हजार रुपये खर्च आला. तर खत आणि इतर मशागतीसाठी वीस हजार रुपये एवढा खर्च झाला. आता या पपईची विक्री अकरा रुपये/किलो प्रमाणे नागपूरला करण्यात येत आहे. विकास गायकवाड यांचं पूर्ण कुटुंब या शेतामध्ये राबतं. पपईसोबतच त्यांनी आपल्या पावणे दोन एकर शेतीमध्ये झेंडूची लागवड केली.  फळबाग शेतीतून त्यांना सध्या चांगला फायदा होत असल्याने त्यांनी फुल शेतीदेखील करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक लाख रुपयाच्या पपईची विक्री करण्यात आली असून आणखी या पपईतून त्यांना साडेतीन लाख रुपयाची अपेक्षा आहे, तर झेंडूच्या फुलाला जर चांगला दर मिळाला तर यातून पाच ते सहा लाखाच उत्पन्न त्यांना मिळणार आहे. पपईची लागवड केल्यानंतर त्यांनी यात आंतरपीकंदेखील घेतली आहेत. त्यातूनही त्यांना चांगल उत्पन्न मिळत आहे. अनेक शेतकरी पपईच्या बागा लावतात, मात्र योग्य नियोजन न केल्याने मोठ्या प्रमाणात फळाची गळ होते. मात्र गायकवाड यांनी आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबल्याने त्यांनी या समस्यांवर मात केली आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब आणि मोसंबीची लागवड केली जाते. त्याचबरोबर आता शेतकरी पपई आणि फुल शेतीकडे वळत आहेत. मुबलक पाण्यावर येणाऱ्या या फळबागेतून एकरी चार ते पाच लाखांचं उत्पन्न घेता येत. माजलगाव परिसरात आता धरणाच्या पाण्यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात आधुनिक शेती करून लाखोंचं उत्पन्न घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
Sanjay Rathod : वसंतराव नाईकांच्या वाटेवर चालणं माझं ध्येय, समाजाचं भलं होईल; मंत्री संजय राठोडांचं वक्तव्य
वसंतराव नाईकांच्या वाटेवर चालणं माझं ध्येय, समाजाचं भलं होईल; मंत्री संजय राठोडांचं वक्तव्य
धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget