Kolhapur Crime : दोन पत्नींमधील होत असलेल्या भांडणांना वैतागून शेतकरी पतीने विष प्राशन (drank poison) केल्यानंतर दुसऱ्या पत्नीने सुद्धा त्यांच्या हातातील विष हिसकावून प्राशन केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील जंगमवाडी गावामध्ये घडली. सुदैवाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने नातेवाईकांनी पती पत्नीला  सीपीआ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने जीव वाचला आहे. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.  


हातकणंगले तालुक्यातील जंगमवाडीमध्ये ही घटना घडली. विष प्राशन केलेला शेतकरी आहे. त्यांचे दोन विवाह झाले आहेत. घरगुती वादविवाद होऊन त्यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यामुळे त्यांनी दुसरा विवाह केला होता. मात्र, त्यांनी दुसरा विवाह केल्यानंतर पहिली पत्नी 12 वर्षांनी पुन्हा त्यांच्याकडे नांदण्यास आली होती. त्यामुळे दोन्ही पत्नी सोबत घेत त्यांचा संसार सुरु होता. 


भांडणाला कंटाळून पतीने घेतले विष 


मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघींमधील वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे दोन पत्नींच्या सातत्याने होणाऱ्या भांडणाला कंटाळून शेतकऱ्याने घरीच शेतात फवारण्यास आणलेले कीटकनाशक प्राशन केले. पतीने विष प्राशन केल्याचे दिसताच दुसऱ्या पत्नीने सुद्धा त्यांच्या हातातील बाटली हिसकावून विष प्राशन केले. त्यामुळे तातडीने दोघांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केल्याने जीव वाचला आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीमध्ये झाली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या