Kolhapur News : जोतिबा डोंगराला (Shree Jyotiba Devasthan) जाणारा मुख्य रस्त्यावर पाण्याचा टाका भागातील रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जोतिबा डोंगराकडे (jyotiba temple main road) जाणारी वाहतूक गायमुख तलावमार्गे सुरू आहे. 


सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या दोन दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. कोणत्याही वाहनाने प्रवेश करू नये यासाठी चर मारून  वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावर सलग तीन वर्षापासून रस्ता खचला आहे. गायमुख मार्गाने वाहतूक वळवण्यात आली असली, तरी या रस्त्यावरही दाणादाण झाली आहे. मार्गावर अनेक ठिकाणी चिखल साचला आहे. त्यामुळे दुचाकी वाहनाचे अपघात होत आहेत. 


कोल्हापूर जिल्ह्यात 14 जुलैपर्यंत मुसळधारेचा हवामान विभागाचा इशारा


दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर (Kolhapur rain) तसेच सातारा जिल्ह्यात घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 41बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. 


हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत


शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, वालोली, यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे, आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, सवते-सावर्डे, शिरगाव, सरूड-पाटणे, कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, कानर्डे, सावर्डे, पिळणी, बिजूर भोगोली, चिंचोली, माणगाव, कोडोली, तांदूळवाडी, शिगाव, दत्तवाड, सुळकूड, शेणवडे, कळे व बीड.


इतर महत्वाच्या बातम्या