Raju Shetti : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै रोजी 50 हजार रुपये जमा होणार होते. मात्र, प्रोत्साहनपर अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालं नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आक्रमक झाले आहेत. येत्या 9 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना 50 हजार मिळाले नाही, तर क्रांती राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी शिंदे सरकारला दिला आहे. 


स्वाभिमानीकडून आज दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री साहेब ही पोकळ धमकी नाही, 10 वर्षांपूर्वी महामार्गावर काय झालं होतं? ते पोलिसांना विचारून घ्या असे सांगत आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल अनुदान संदर्भात धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत जाचक अटी रद्द करून अनुदान देण्याची मागणी केली होती. यावरून त्यांनी दोघांचाही समाचार घेतला. 


राजू शेट्टी म्हणाले, एकाची आई  जिल्हा बँकेत संचालक आहे, दुसऱ्याचा भाऊ जिल्हा बँकेत आहे. त्यामुळे निवदेन देण्यापूर्वी दोघांनी माहिती घेतली असती, तर काय अडचण आहे लक्षात आली असती टोला लगावला. अडसारी लावण करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.  


राजू शेट्टी काय म्हणाले?



  • आज छत्र्या घेऊन आलो आहे, उद्या याचे भाले होतील

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचे शेतीत काम केलेले फोटो पाहिले आहेत

  • मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

  • पण केवळ फोटो टाकू नका, आमचे पैसे पहिल्यांदा द्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील

  • उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला पण त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच निघून गेले

  • निवेदनाची नाटकी करून काही होणार नाही

  • गेल्यावेळी देखील बैठकीला माझ्या अगोदर हे खासदार गेले होते

  • त्यावेळी झालेल्या बैठकीतील पैशाचे काय झाले, त्या 135 रुपयांपैकी अजूनही 15 रुपये द्यायचे आहेत


इतर महत्त्वाच्या बातम्या