Kolhapur Crime : जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील कालपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. संकेत राजेश बामणे असे त्या मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. तो अवघ्या 8 वर्षांचा होता. काल सायंकाळी घरातून खेळून येतो म्हणून  बाहेर पडल्यानंतर थेट मृतदेह आढळल्याने कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. 

Continues below advertisement


काल घराजवळ असलेल्या विहिरीजवळ संकेतची कपडे आढळून आल्याने तो विहिरीत पडला असावा, या अंदाजाने त्या विहिरीत शोधमोहिम हाती घेतली होती, मात्र रात्री उशिरापर्यंत शोधमोहिम हाती काहीच न लागल्याने आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. 


आज सकाळपासून या पथकांकडून शोधमोहिम पुन्हा सुरु करण्यात आल्यानंतर दुपारच्या सुमारास मृतदेह मिळाला. संकेत काल शाळेतून घरी परतल्यानंतर काही काळ अभ्यास करत बसला होता. सायंकाळी  सातच्या सुमारास तो खेळून येतो म्हणून बाहेर पडला. मात्र, बराच उशिरा घरी न परतल्याने कुटुबीयांची घालमेल वाढली. 


शोधूनही न सापडल्याने त्यांनी पोलिसांना कळवण्यात आले. यानंतर पोलिसांना विहिरीच्या काठावर संकेतचा शर्ट आणि पँट तत्काळ शोधमोहिम राबवण्यास सुरुवात केली. मात्र, हाती काहीच न लागल्याने एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापनाला सकाळी पाचारण करण्यात आले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या