Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीसाठी जिल्ह्यातील तालुकानिहाय ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. आरक्षणाची सोडत शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहामध्ये होणार आहे.
पंचायत समिती आरक्षणासाठी तालुकानिहाय ठिकाणे शाहूवाडी पंचायत समिती सभागृह, पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद हॉल, मयूर बाग, बस स्टँड शेजारी. हातकणंगले - तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, शिरोळ तहसील कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत.
कागल - बहुउद्देशीय सभागृह. करवीर राजर्षी शाहू सभागृह, पंचायत समिती कार्यालय, सीपीआर चौक, कोल्हापूर, गगनबावडा - तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत. राधानगरी तहसील कार्यालय, राजर्षी शाहू सभागृह, भुदरगड दिनकरराव जाधव सभागृह, पंचायत समिती कार्यालय, गारगोटी, आजरा - तहसील कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत. गडहिंग्लज शाहू सभागृह, नगरपरिषद, गडहिंग्लज, चंदगड तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : मतदारसंघाची प्रारुप रचना जाहीर
दरम्यान, कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा परिषदेच्या 76 आणि 152 पंचायत समित्यांच्या मतदारसंघाची प्रारुप रचना जाहीर करण्यात आली आहे. नव्या प्रारुप रचनेनुसार झेडपीचे 9, तर पंचायत समित्यांच्या 18 मतदारसंघांची वाढ झाली आहे. नव्या प्रारुप रचनेत काही गावांची अवस्था अर्धे इकडे आणि उर्वरित तिकडे अशी झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची प्रचार कतरताना चांगलीच दमछाक होणार आहे. नव्या प्रारुप रचनेत करवीर तालुक्यामध्ये 2 मतदारसंघ वाढले आहेत.
गगनबावडा, भुदरगड, आजरा आणि गडहिंग्लज या तालुक्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. बाकी 7 तालुक्यांमध्ये झेडपीचा एक गट वाढला आहे, तर पंचायत समित्यांमध्ये 18 मतदारसंघांची वाढ झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या