Shivaji University, कोल्हापूर : कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय..शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनेनं आंदोलन पुकारलय..तर याला शिवप्रेमी.. पुरोगामी जनतेनं बैठक घेवून विरोध केलाय..दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य बैठकीतही याचे पडसाद उमटलेत..यावरून हिंदुत्ववादी संघटना आणि पुरोगामी कोल्हापूरकर आमनेसामने आल्याचं समोर आलयं..पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट..
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 रोजी झालीये..तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ साकारलं..गेली 62 वर्ष झाली शिवाजी विद्यापीठ या नावानेच विद्यापीठाची कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात ओळख आहे..दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी भूमिका घेतली आहे..विद्यापीठाचं नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी आता जोर धरू लागलीयं..याच पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने 17 मार्चला कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात येणार आहे..या मोर्चात भाजपचे तेलंगणातील आमदार टी.राजा हे देखील सामील होणार आहेत. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती दिलीये.
टी राजा काय काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी सारा हिंदू मैदानात आहेत. कोल्हापुरातील सर्व हिंदुंनो मी कोल्हापुरात येत आहे. 17 मार्च रोजी दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाजी महाराज यांना छत्रपती या पदवीपासून कोण रोखत आहे? कोण आमच्या इतिहासावर आणि स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित करत आहे? या सर्वांना आव्हान देण्यासाठी मी कोल्हापुरात येत आहे, असं भाजपचे परराज्यातील आमदार टी राजा म्हणाले आहेत.
दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराला शिवप्रेमी आणि पुरोगामी कोल्हापूरकरांनी कडाडून विरोध केलायं..छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत.. परंतु शिवाजी हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे..या शब्दामध्येच प्रचंड ताकद आहे..त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठाच नामांतरण होवू देणार नसल्याची भूमिका कोल्हापूरकरांनी घेतलीय..
शिवाजी विद्यापीठाच्या आज झालेल्या सिनेट सदस्य बैठकीत ही याचे तीव्र पडसाद उमटलेतं..आमच विद्यापीठ..शिवाजी विद्यापीठ अशा घोषणा देत नामांतराला विरोध दर्शविण्यात आलायं..यावेळी सदस्यांनी मांडलेला स्तगन प्रस्ताव प्रशासनाने स्विकारला नसल्याने बैठकीतच निषेधाचे पत्रकं सदस्यांनी भिरकवलेतं..त्यानंतर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने सिनेट सदस्यांचा स्तगन प्रस्ताव स्विकारलायं...मात्र पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठाच्या नावावरून नवा वाद उभा राहिलाय....
इतर महत्त्वाच्या बातम्या