बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
एकीकडे देशभरात छावा चित्रपटाची धूम पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीके छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजीराजेंना किती निर्घुणपणे ठार मारण्यात आल्याचा इतिहास पाहून तीव्र संतापही व्यक्त होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीराजेंची हत्या करणाऱ्या आरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारच्या पुरातत्व विभागाकडून याची देखभालही होत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान, त्यांच्यावर औरंगजेबाकडून झालेल्या अत्याचाराच्या इतिहासाची आठवण घेत काही हिंदुत्त्वावादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच, या संघटनानी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे.
औरंगजेबच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस वाढवण्यात आला असून एसआरपीची एक तुकडी कबरीच्या घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे.
छ. संभाजीनगरमध्ये कबरीच्या ठिकाणी दोन पोलीस अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तात तैनात करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी आज कबर परिसरात व आतमध्ये जाऊन पाहणी केली.
कबर परिसरातील दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, दोन ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. तसेच, कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला चेक करूनच सोडले जात आहे
पोलीस उपअधीक्षक यांनी कालच कबरीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर, आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून ही कबर हटविण्याची मागणी करत इशारा देण्यात आल्याने येथील बंदोबस्त वाढविण्यात आलाय.