एक्स्प्लोर

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्ग तत्काळ रद्द करा; माजी खासदार संजय मंडलिकांची मागणी, कोल्हापुरातून महायुतीच्या नेत्यांकडूनही विरोध

या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध वाढत असून शक्तिपीठ महामार्ग तत्काळ रदद करण्याची मागणी माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

कोल्हापूर : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचे काम हाती घेतले असून यासाठी 27 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध वाढत असून शक्तिपीठ महामार्ग तत्काळ रदद करण्याची मागणी माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. प्रकाश आबिटकर यांनीही शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप नेते समरजित घाटगे यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे.

6 सहा तालुक्यातील शेतजमीन शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार

कोल्हापूर जिल्ह्यातील 6 सहा तालुक्यातील शेतजमीन शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार आहे. भुदरगड तालुक्यातील 21, आजरा तालुक्यातील 5, शिरोळ तालुक्यातील 5, हातकणंगले तालुक्यातील 5 करवीर तालुक्यातील 10 व कागल तालुक्यातील 13 गावातून शक्तिपीठ महामार्ग जात आहे. 

हजारे हेक्टर क्षेत्र या महामार्गामध्ये संपादित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. या शेतकऱ्यांच्या अल्प प्रमाणात असणाऱ्या जमिनी शक्तिपीठ महामार्गामध्ये गेल्यास शेतकऱ्यांना उपजिवीकेसाठी जमिन शिल्लक रहाणार नाही, त्यामुळे शेकऱ्यांमध्ये या शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड विरोध दर्शविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता हा महामार्ग तत्काळ रद्द करणे गरजेचं असल्याचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी यांना देण्यात आल्याची माहिती दिली. 

या महामार्गात बाधित होणारी गावे कोणती आहेत?

  • शिरोळ तालुका - कोथळी, दानोळी, निमशिरगाव, तारदाळ
  • हातकणंगले तालुका - तिळवणी, साजणी, माणगाव, पट्टणकोडोली, 
  • करवीर तालुका - सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, नेर्ली, विकासवाडी, कणेरीवाडी, कणेरी, कोगील बुद्रुक, वडगाव खेबवडे 
  • कागल तालुका - कागल, व्हनूर, सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी, व्हनाळी, कोनवडे, सावर्डे बुद्रुक, सावर्डे खुर्द, सोनाळी कुरणी, निढोरी, व्हनगुत्ती
  • भुदरगड तालुका - आदमापूर, वाघापूर, मडिलगे बुद्रुक, कूर, मडिलगे खूर्द निळपण, धारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डी, पुष्पनगर, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, वेंगरूळ, सोनुर्ली, मेघोली, नवले, देवर्डे, कारिवडे
  • आजरा तालुका - दाभिल, शेळप, पारपोली, आंबाडे, सुळेरान

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget