Satej Patil on Hasan Mushrif : मुश्रीफ साहेब कोणत्याही संकटात आम्ही तुमच्या पाठीशी, काही काळजी करू नका; सतेज पाटलांनी दिले बळ
मुश्रीफ साहेब (satej Patil on Hasan Mushrif) कोणत्याही संकटात आम्ही तुमच्या पाठीशी, काही काळजी करू नका, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी बळ दिले.
Satej Patil on Hasan Mushrif : मुश्रीफ साहेब (satej Patil on Hasan Mushrif) कोणत्याही संकटात आम्ही तुमच्या पाठीशी, काही काळजी करू नका, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी बळ दिले. कागलमध्ये (Kagal) आज विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) कागल दौऱ्यावर आहेत. यावेळी वाय. डी. माने सभागृहाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्यासह आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत आसगावकर आदी नेते उपस्थित होते. हे सभागृह राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या निधीतून उभारण्यात आलं आहे. या कार्यक्रमासांठी मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती होती.
गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवाईने हसन मुश्रीफ अडचणीत आहेत. याच पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी त्यांना बळ दिले. ते म्हणाले की, मुश्रीफ साहेब कोणत्याही संकटात आम्ही तुमच्या पाठीशी, काही काळजी करू नका. संकट काळातही हा वाघ खंबीरपणे उभा राहील याची आम्हाला खात्री आहे. जिल्ह्याचे श्रावण बाळ म्हणून आपण काम केलं आहात. कागल हा मुश्रीफ यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे अजित पवार यांनीही कागल दौरा करत मुश्रीफांना बळ दिले आहे.
हसन मुश्रीफ अडचणीत
हसन मुश्रीफांशी संबंधित (Hasan Mushrif ED Raid) अवघ्या 21 दिवसांच्या अंतराने दोनदा ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. एका बाजूने हा धक्का असतानाच त्यांना आणखी एक धक्का काल बसला आहे. त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीन्यासाठी मुंबई सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला होता. मात्र, या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ही परिस्थिती एका बाजूला असतानाच कागलमध्येही राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी समरजितसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ गटांमध्ये वाद चांगलाच टोकाला गेला आहे. दोन्ही बाजूंकडून सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांनी कागलचा दौरा करत एक प्रकारे पक्ष सोबत असल्याचे दाखवून दिल्याची चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या