एक्स्प्लोर

Sambhajiraje Chhatrapati : तरच संभाजीराजेंना कोल्हापुरात पाठिंबा देणार; महाविकास आघाडीने पहिला डाव टाकला!

Sambhajiraje : महाविकास आघाडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील तीनपैकी एका पक्षाच्या तिकिटावर संभाजी राजेंनी लढावं, तरच कोल्हापुरात लोकसभेला पाठिंबा देण्याची मविआची भूमिका आहे. 

कोल्हापूर/नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले (Hatkanangle) मतदारसंघ महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा झाला असतानाच आता महाविकास आघाडीने संभाजीराजेंच्या (Sambhajiraje Chhatrapati on Loksabha Election) हालचालींवरून सूचक भाष्य केलं आहे. संभाजीराजे महाविकास आघाडीतील पक्षांपैकी लढले तरच पाठिंबा देण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. संभाजीराजे स्वतंत्रपणे त्यांच्या स्वराज्य संघटनेतून लढले, तर मविआ पाठिंबा देणार नाही. 

महाविकास आघाडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील तीनपैकी एका पक्षाच्या तिकिटावर संभाजी राजेंनी लढावं, तरच कोल्हापुरात लोकसभेला पाठिंबा देण्याची मविआची भूमिका आहे. 

संभाजीराजेंकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत!

दुसरीकडे, माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. अलीकडेच त्यांनी 2009 मध्ये झालेली जखम अजूनही विसरलेलो नाही, असे सांगत त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात राहणार यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. मात्र आम्ही अजून किती जागा लढवणार याबाबत अजून स्पष्टता नाही. आमच्यावर 2009 मध्ये झालेल्या जुन्या जखमा आम्ही अजूनही विसरलो नाही. आमच्यावर कोणीही वार करू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला सर्वांना दिसेल. स्वराज्यबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, त्यामुळे संभाजीराजे लढणार की नाही लढणार हे वेळच ठरवेल. कोल्हापूर, नाशिक की संभाजीनगर हा निर्णय सुद्धा वेळ ठरवेल असे सुद्धा त्यांनी म्हटले होते. चर्चेसाठी सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचे ते म्हणाले होते.जे कोणी जास्त प्रेम देतील तिथे संभाजीराजे उभारणार असल्याचे ते म्हणाले होते. 

दरम्यान, मागील महिन्यात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना वाढदिनी सतेज पाटील यांनी वाड्यावर जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर संभाजीराजे यांची सुद्धा भेट झाली होती. यावेळी बोलताना पाटील यांनी संभाजीराजे यांचे स्वागत असल्याची भूमिका मांडली होती. ते म्हणाले की, स्वराज्य पक्षाने राज्यात चांगलं वातावरण तयार केलं आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू आहे का? हे पहावं लागेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये राजू शेट्टी आणि संभाजीराजे यांच्यासोबत ही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले होते. त्याचबरोबर त्यांनी सरप्राईज चेहरा असेल, असेही भाष्य केले होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून जर तरचा मुद्दा आल्याने संभाजीराजे उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Embed widget