एक्स्प्लोर

Kolhapur News : महिलेच्या खांद्यावरून बंदूक कशासाठी? ठोकणार होता, तर व्यासपीठावर तिसऱ्या रांगेत का बसला होता? रविकिरण इंगवलेंकडून क्षीरसागरांवर पलटवार

Kolhapur : शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. राजेश क्षीरसागर म्हणजे सिंघममधील जयकांत शिकरे असल्याची बोचरी टीका रविकिरण इंगवले यांनी केली आहे. 

Kolhapur News : कोल्हापूर शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मी त्या ठिकाणी असतो, तर ठोकून काढलं असतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेनंतर रविकिरण इंगवले यांनीही जोरदार पलटवार केला आहे. राजेश क्षीरसागर म्हणजे सिंघममधील जयकांत शिकरे असल्याची बोचरी टीका केली आहे. 

विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रविकिरण इंगवले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महिलेच्या खांद्यावरून बंदूक कशासाठी चालवत आहात? ठोकून काढणार होता, तर तिसऱ्या रांगेत कशासाठी बसला होता? पदराआडून राजकारण करू नये. 

पेड कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या सभेला लागतात 

राजेश क्षीरसागर यांनी पेड कार्यकर्त्यांकडून गुन्हा केल्याचे म्हटले होते. त्यामध्ये फिरंगाई तालमीचा एकही कार्यकर्ता नव्हता असेही म्हटले होते. यावरून रविकिरण इंगवले यांनी टोला लगावत पेड कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना लागतात, कोल्हापुरात शिवसेनेसाठी लागत नाहीत, असे म्हणाले.  इंगवले पुढे  म्हणाले की, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांच्याच बूथवरून पूर्ण मिरवणुकीचे चित्रीकरण केलं आहे. मी दोषी असेन तर देश सोडून जाईन. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांविरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा

कोल्हापूरमध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रकारावरून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यावेळी मंडपाच्या व्यासपीठावरील महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन, हातवारे आणि शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काल उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला, तरी कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. शिंदे गटाच्या शहर संघटकांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये राजेश क्षीरसागर गटाच्या बूथ समोर मिरवणूक आल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Smita Jadhav: तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पीएम मोदी, मुख्यमंत्र्यांचे आभार; विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते: पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधवांचा विश्वास
जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पीएम मोदी, मुख्यमंत्र्यांचे आभार; विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते: पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधवांचा विश्वास

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget