Weather Update: महापुराचे रौद्ररुप पाहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhpur Weather Update) चालू मोसमात सपशेल दडी मारल्याने अवस्था चिंताजनक होत चालली आहे. जुलै महिन्यात पूर्ण झालेल्या शेतीच्या पेरण्या, ओसंडून वाहणाऱ्या नद्या, धरणांमध्ये किमान निम्म्याहून अधिक पाणीसाठा असेच चित्र आजवर कोल्हापुरात दिसून आले आहे. मात्र, यंदा कोल्हापूर जिल्ह्यावर पाऊस रुसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्याचा अपवाद वगळल्यास कोल्हापूर शहर आणि आठ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेतही पाऊस झालेला नाही. त्यामुळे केलेली पेरणी संकटात आली आहेच, पण पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या खरीपाच्या पेरण्याही पूर्ण झालेल्या नाहीत. सर्वाधिक बिकट परिस्थिती शिरोळ तालुक्यात आहे. ज्या तालुक्याने कृष्णा पंचगंगेच्या महापुराने सर्वाधिक वेदना अनुभवल्या तोच तालुका आज  पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत पाऊस अजूनही झालेला नाही. 


अल निनोचा प्रभाव


या सर्व पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सचिन पन्हाळकर यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात पाऊस कमी का झाला हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. जून आणि जुलै महिन्यातील सरासरी पाहिल्यास अत्यंत कमी पाऊस झाला आहे. आएमडी बुलेटिननुसार यासाठी दोन कारणे सांगितली गेली आहेत. यामध्ये चालू वर्षात जाणवणारा अल निनोचा प्रभावचा समावेश आहे जो ओसियन करंट असून तो उष्ण आहे. त्याचा प्रभाव तीन ते पाच वर्षांनी आपल्याला जाणवतो. त्याची निर्मिती पॅसिफिक महासागरात पेरु देशाच्या किनाऱ्यावर त्याची निर्मिती होते. त्याची उत्पती झाल्यानंतर मान्सूनचे प्रमाण कमी होऊन जाते. 


त्यांनी पुढे सांगितले की, अल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी आणखी एक यंत्रणा कार्यरत असते. यामध्ये इंडियन ओसियन डायपोल (indian ocean dipole) ही एक संकल्पना आहे. इंडियन ओसियन म्हणजेच अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आहे. त्यांच्या सरफेस तापमानात बदल झाला आहे. अरबी समुद्राचे तापमान जास्त असल्यास मान्सून प्रामुख्याने सामान्य असतो. आणि बंगालच्या उपसागरात तापमान जास्त असल्यास निगेटिव्ह इंडियन ओसियन डायपोल असे म्हटले जाते आणि अरबी समुद्राचे जास्त असल्यास पाॅझिटिव्ह इंडियन ओसियन डायपोल असे म्हटले जाते.  


उत्तर भारतात पावसाचा हाहाकार का झाला?


पन्हाळकर पुढे म्हणाले की, सध्या ही परिस्थिती न्यूट्रल असल्याचे दिसून येते. बंगालच्या उपसागराचे अरबी समुद्राइतकं तापमान वाढलेलं नाही. त्यामुळे त्याचा परिणाम जाणवत आहे. एकंदरीत विचार केल्यास मध्य भारतात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. उत्तर भारतात पाऊस सर्वाधिक कोसळत आहे. वेस्टर्न डिस्टबन्स (western disturbances cause rainfall in) आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे मान्सून वारे त्याची एक शाखा भारतातून जाते, त्या एकमेकांच्या समोर आल्याने मोठ्या प्रमाणावर पाऊस पडताना दिसत आहे. एकूण पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामध्ये नाॅर्मर रेंजमध्ये पाऊस होईल, असे म्हटले आहे. मात्र, ही परिस्थिती कशी बदलते हे पाहावं लागेल. कोकणात पाऊस होत असला, तरी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात इंडियन ओसियन डायपोल पाॅझिटिव्ह झाल्यास पावसाची टक्केवारी भरून निघेल. वारे कसे वाहतात, त्यामध्ये बदल कसा होतो आणि त्या पद्धतीने परिस्थिती अनुकूल झाली, तर पावसाची टक्केवारी भरून निघेल. कदाचित सात ते आठ दिवसातही पावसाची टक्केवारी भरून निघेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केला. 


इतर महत्वाच्या बातम्या