एक्स्प्लोर

राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकरांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या हस्ते गौरव

Prakash Abitkar : आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघातील जनतेच्या समस्या सभागृहात मांडून त्याची सोडवणूक केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. 

राधानगरी  : आपल्या मतदारसंघातील जनतेच्या समस्या पोटतिडकीने सभागृहात मांडून त्या सोडविणे तसेच अनेक विकास कामांसाठी भरघोस निधी मिळवुन विकास कामे पुर्णत्वास नेत सभागृहात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांना सन 2019 -20 चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई येथील विधान भवनात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार आबिटकर यांना वितरित करण्यात आला. 

विधानसभा सदस्य म्हणून 10 वर्ष काम करत असताना विधिमंडळातील विविध आयुधांचा वापर करून मतदार संघातील तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्याला वाचा फोडण्याचे काम एक विधानसभा सदस्य म्हणून आमदार आबिटकर यांनी केले. 

छ. राजश्री शाहू महाराज यांचा वसा व वारसा असलेल्या कोल्हापूर जिल्हा कृषी, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, जलसंपदेने संपन्न असा जिल्हा असून या जिल्ह्याने देशाला संशोधक, ऑलम्पिकवीर, कुस्तीवीर,  शिक्षणतज्ञ, लेखक, राजकारणी दिले आहेत. अशा जिल्हातून आलेल्या युवा आमदार प्रकाश आबिटकर यांनी सन 2014-2024 अशा 10 वर्षांच्या कार्यकाळामध्ये विधानसभा कामकाजात आग्रही सहभाग घेत तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अशासकीय विधेयके, औचित्याचे मुद्दे, अल्प सूचना, अर्धा-तास चर्चा, राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा, विभागवार चर्चा, अर्थसंकल्पीय भाषण चर्चा विविध विधेयकांवेळी घेतलेला सहभाग अशा चौफेर विधीमंडळ आयुधांचा वापर करत प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम केले.

यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी आग्रही भूमिका, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, राज्यातील पोलिस पाटलांचे मानधन वाढ, कोतवालांचे विविध प्रश्नांची सोडवणूक, होमगार्ड यांचे वेतन वाढ व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, माध्यमिक शिक्षकांच्या शाळांची अनुदान वाढ, अंशकालीन कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत घेणे, राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरण, आरटीओ पदभरतीतील उमेदवारांची नियुक्ती, शासकीय सेवेतील एम.एस.सी.आयटी न केलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, लाकूड व्यवसायीकांचे प्रश्न, कंत्राटी तत्वावर शासन सेवेत असलेल्या कर्मचार्यांचे प्रश्न, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न, ग्रामपंचायत मधील डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे प्रश्न, अनुकंपा पदभरती, शासकीय तसेच निमशासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न, एसटी महामंडळातील प्रलंबित पद भरती, कृषी कायदे सक्षमीकरण करणे, कामगार कायदे सक्षमीकरण करणे, या सह मतदारसंघातील प्रलंबित सिंचन प्रकल्प, रस्ते, वीज, प्रशाकीय इमारती, राधानगरी धरण व अभयारण्य, तालुक्यातील 84 गावांचे पर्यटन प्राधिकरण, प्रादेशिक पर्यटन निधीतून पर्यटन विकास, ब वर्ग देवालयांना मान्यता अशा विविध कामातून आपला ठसा उमटवण्याचे काम केले आहे. जिल्ह्यात प्रशासकीय कामामध्ये कर्तव्यदक्ष असे लोकप्रतिनिधी म्हणून तसेच प्रशासनावर जबर पकड असलेले आमदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. 

या सर्वांबरोबर विधान भवनात अधिवेशन काळात सर्व दिवस हजेरी सुध्दा लावुन अनेक प्रश्न उपस्थित करीत विशेष अशी कामगिरी केली याची दखल घेत शासनाच्या वतीने त्यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखे तर्फे सन २०१९-२०२० या वर्षाचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.आज या पुरस्कार वितरणासाठी विधान भवनात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या प्रसंगी देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची प्रमुख उपस्थिती होती. तर राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अंबादास दानवे, रामदास आठवले, नारायण राणे यांच्या सह विधिमंडळातील सर्व सदस्य व मंत्री उपस्थित होते. 

काय म्हणाले प्रकाश आबिटकर? 

खरंतर हा माझा सन्मान नसून राधानगरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आजवर राधानगरी विधानसभा मतदारसंघ राज्याचे राजकीय पटलात नेहमी चर्चेत राहिला आहे. मतदारसंघाला विविध योजनातून भरीव निधी यावा आणि मतदारसंघ संपूर्ण विकसित व्हावा अशी माझी मनोमन इच्छा राहिली आहे. आणि ते  मी करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व करत असताना विधिमंडळातील माझ्या कामगिरीची दखल घेऊन आज महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मला उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळाला. हे सर्व शक्य झाले आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने त्यामुळे हा पुरस्कार मी राधानगरी विधानसभा मदारसंघातील मायबाप जनतेला अर्पण करत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Tafa Car Accident | केजमध्ये शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात ABP MajhaMaharashtra Portfolio Allocation | महायुतीचं खातेवाटप जाहीर, चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल ABP MajhaDeepak Kesarkar VS Aaditya Thackeray | शालेय गणवेशावरून आदित्य ठाकरे- केसरकरांमध्ये जुंपली ABP MajhaEVM Mahrashtra Election | EVM चं काठमांडू कनेक्शन? भारत जोडोतील नेत्यांचं काय संबंध? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
Embed widget