कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात (earthquake tremors in Kolhapur Sangli Satara districts) आज (16 ऑगस्ट) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज (16 ऑगस्ट) सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.


सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचा धक्का


दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. मॉर्निग वाॅकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोल्हापूर सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरापासून 15 किमी परिसरात  भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप सकाळी झाला. सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.


गेल्या महिन्यात सिंधुदुर्गमध्ये भूकंपाचे धक्के 


दरम्यान, गेल्या महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. 29 जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवले आणि जमीनही हादरली होती. तीन वर्षांपूर्वी असाच काहीसा धक्का सावंतवाडी शहरासह परिसरात बसला होता. यावेळी माडखोलसह दाणोली, सातोळी, बावळट, अगदी बांद्यापर्यंत जमीन हादरल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या