एक्स्प्लोर

चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'

Gokul Election: गोकुळमध्ये तुम्ही, कोल्हापूर जिल्हा बँकेत तुम्ही, मंत्री तुम्ही, आम्ही जायचे कुठे? आम्ही फक्त झेंडे घेऊन फिरायचे का? अशी विचारणा त्यांनी केली. 

Gokul Election: आमचे 'राष्ट्रीय' नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी मला गोकुळच्या बैठकीला बोलावलं नाही. हसन मुश्रीफ यांना बोलावलं, पश्चिम महाराष्ट्राचे नेते सुमित कदम यांना बोलावलं. कोल्हापूर जिल्हा, गोकुळचा सुमित कदम यांचाशी संबंध नाही, पण आम्हाला बोलावले नाही, असा थेट हल्लाबोल आमदार शिवाजी पाटील यांनी केला. हे जर आम्हाला जमेत धरत नसतील तर सतेज पाटीलला आमचे विरोधक नाहीत, असा इशारा सुद्धा पाटील यांनी दिला.

फडणवीस यांच्या कानावर बाब घालणार 

शिवाजी पाटील म्हणाले की, नेमकं काय सुरू आहे हे मीडियाच्या माध्यमातून कळतं. अपात्र केलेल्या संस्था पात्र केल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही बाब घालणार आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरात अनेक संस्था असून या संस्था आल्या कुठून? अपात्र संस्था पात्र झाल्या तर गोकुळ राहणार नाही. एका नेत्याच्या घरात गोकुळ निघून जाईल. माझ्या मतदारसंघात आणि सर्वत्र साम-दाम दंड आणि गोकुळची दहशत या जोरावर शेतकऱ्यांच्याकडून ठराव गोळा केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 

पाटील यांनी सांगितले की, हसन मुश्रीफ पंचवीस वर्षे मंत्री राहिले. त्यांनी चंदगडसाठी काय केले? आम्हाला देखील भावना असतात आम्ही किती सहन करायचं? गोकुळमध्ये तुम्ही, कोल्हापूर जिल्हा बँकेत तुम्ही, मंत्री तुम्ही, आम्ही जायचे कुठे? आम्ही फक्त झेंडे घेऊन फिरायचे का? अशी विचारणा त्यांनी केली. 

दादांनी देखील चंदगडसाठी काही केलं नाही

ते पुढे म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील हे देखील मंत्री होते. त्यांच्याकडे खूप मोठे पद आहे. दादांनी सुद्धा चंदगडसाठी काही नाही. चंद्रकांत दादा पाटील आता मुश्रीफ साहेब यांना घेऊन चालले आहेत, पण चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप म्हणून आम्हाला जवळ केलं नाही. आम्ही चंद्रकांत दादा पाटलांवर आरोप करत नाहीत पण या आमच्या भावना असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही खंत बोलावून दाखवायची होती, पण विधान परिषद माघारीमुळे भेटता आले नसल्याचे ते म्हणाले. मला आमदारकीचे स्वप्न किंवा लालच नाही लाचार होणे हा माझा स्वभाव नाही.. मला माझ्या नेत्यांनी असं शिकवलेलं नाही, असेही ते म्हणाले. 

भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मी लढत राहणार

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना स्ट्रॉंग आहे, भाजप कुठे आहे ? भाजप म्हणजे जिल्ह्यामध्ये महाडिक परिवार खूप सक्षम आहे, अमल महाडिक आमदार आहेत. दुसरे आमदार आवाडे साहेब आहेत, मग पक्ष वाढणार कधी? त्यामुळे मी कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मी लढत राहणार. कार्यकर्त्यांनी काय करायचं हे कोणीही समजून सांगत नाही. प्रत्येक जण स्वार्थ पाहत आहे.. एका घरात अनेक पद आहेत. प्रत्येकाला वाटतं माझ्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत, तेच मला बोलायला सांगत असतील माझ्या पाठीशी देवेंद्र फडणवीस आहेत, पण गोकुळबाबतचा लढा माझा होता. 1310 संस्था आमच्यावर लादल्या नसत्या, तर आम्ही आहे तसं निवडणुकीला सामोरे गेलो असतो असे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 
Kolhapur Crime: मुलगी झाल्यामुळे सासरच्यांनी कोल्हापूरात विवाहितेला संपवल्याचा आरोप, नवरा, सासू-सासरे अन् नणंदेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
मुलगी झाल्यामुळे सासरच्यांनी कोल्हापूरात विवाहितेला संपवल्याचा आरोप, नवरा, सासू-सासरे अन् नणंदेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
Kolhapur Asmita Katkar Death Case: मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप
मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Embed widget