एक्स्प्लोर

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापुरात गोवर रुबेला लसीकरणास आजपासून सुरुवात

राज्यातील अनेक शहरांमध्ये सद्या गोवरचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचे मार्गदर्शनात शहरात घरोघरी सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे.

Kolhapur Municipal Corporation : राज्यातील अनेक शहरांमध्ये सद्या गोवरचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचे मार्गदर्शनात शहरात घरोघरी सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे दिनांक 15 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत पहिल्या टप्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा आजपासून प्रारंभ होणार आहे. दुसरा टप्पा 15 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

गोवर विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळयाची जळजळ, चेहऱ्यावरील आणि शरीरावर लाल सपाट पुरळ अशी गोवरची लक्षणे आहेत. रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर गोवरची लक्षणे दिसून येतात. गोवर हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. या आजाराची लक्षणे आढळलेस घाबरुन न जाता महानगरपालिकेच्या नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला अथवा महानगरपालिकेच्या रुग्णालयाला भेट द्यावी. प्रशासक यांनी सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहून अधिक गतीमानाने कृतीशील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. (Kolhapur Municipal Corporation)

मोहिम कालावधीमध्ये लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांना लसीकरण करणेत येणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये गोवर रुबेलाचे कामकाज सुरु असून नोव्हेंबर अखेर 6932 एवढ्या मुलांना पहिला डोस व 6868 मुलांना दुसरा डोस देणेत आला आहे. गोवर रुबेला लसीकरणाबरोबरच व्हिटॅमिन अ जीवनसत्वाचा डोस देणेत येणार आहे. यामध्ये 9 महिने ते 12 महिने वयोगटातील मुलांना पहिला डोस आणि 16 ते 24 महिने वयोगटातील मुलांना दुसरा डोस देणेत येणार आहे. गोवर रुबेला लसीकरण 26 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करणेचे नियोजन आहे. 

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 9 महिने ते 5 वर्षे ज्या मुलांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही अशा वंचित मुलांसाठी दोन टप्प्यामध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. शहरातील 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना गोवर रुबेला उद्रेकापासून बचाव करणेसाठी ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना गोवर रुबेलाचा पहिला व दुसरा डोस व  व्हिटॅमिन-अ चा डोस दिला नसेल अशा पात्र लाभार्थ्यांनी दिनांक 15 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत नजिकच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Chairman Election 2026: फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
पती गाढ झोपेत असतानाच पत्नीने केला घात, पतीला जागेवरच संपवलं, धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं 
पती गाढ झोपेत असतानाच पत्नीने केला घात, पतीला जागेवरच संपवलं, धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं 
Satej Patil: 'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
Embed widget