Kolhapur Weather Update: कोल्हापूर शहराला (Kolhapur Weather Update) अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा असली, तरी जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर (Kolhapur) शहरासाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या 24 तासांमध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, आणि शिरोळ हे पंचगंगा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण सात बंधारे पाण्यात पाण्याखाली गेले आहेत. 


पंचगंगेची पातळी 18 फुटांवर 


दरम्यान, शुक्रवारी मोसमात प्रथमच कोल्हापुरातील (Kolhapur Weather Update) राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी 18 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट असून धोकापातळी 43 फूट आहे. 


सर्वच धरणांमधील पाण्याची पातळी 30 ते 50 टक्क्यांच्या घरात


कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) विलंबाने मान्सून केल्यानंतरही अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये तसेच तलावांमध्ये पाणीसाठ्यात वाढ संथगतीने सुरु आहे. फक्त चंदगड तालुक्यातील घटप्रभा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून सध्या 2072 क्सुसेकने विसर्ग सुरू आहे. अन्यथा सर्वच धरणांमधील पाण्याची पातळी 30 ते 50 टक्क्यांच्या घरात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लहान-मोठे असे एकूण 15 प्रकल्प आहेत. या एकाही प्रकल्पातून अद्याप एक क्युसेकही पाणी सोडले जात नाही दरम्यान, हवामान विभागाने गेल्या काही दिवसांपासून वर्तवलेले मुसळधार पावसाचा अंदाजही फोल ठरला आहे. मुसळधार पावसाचा इशारा देऊनही कोल्हापूरमध्ये पावसाने उघडीप दिली होती. गेल्या 48 तासांपासून पावसाला तितका जोर नसला तरी रिपरिप मात्र सुरू आहे. 


जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये शाहूवाडी, गगनबावडा आणि चंदगड तालुक्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र कोल्हापूर शहरासह उर्वरित जिल्ह्यामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. एक जूनपासून सर्वाधिक पाऊस भुदरगड, गगनबावडा आणि शाहुवाडी तालुक्यात झाला आहे. राधानगरी धरणात फक्त 35.55 टक्के पाणीसाठा झाला आहे. काळम्मावाडी धरणात अवघा 11 टक्के पाणीसाठा आहे. दुसरीकडे, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसाने कोयना धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. सध्या धरणामध्ये 19 टीएमसी पाणीसाठा असून त्यामध्ये 30, 266 क्युसेकने आवक सुरु आहे. अलमट्टी धरणात अजून कोणत्याही प्रकारची आवक सुरु झालेली नाही. केवळ 584 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या