पन्हाळा गडाला लागूनच असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसे हटवलं, पोलिस बंदोबस्तात प्रशासनाची मध्यरात्री कारवाई
किल्ले पावनगडावरील अनाधिकृत अतिक्रमण केलेले मदरसा हटवण्यात आले आहे. हिंदूत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे
कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolahpr News) पन्हाळा गडाला (Panhala) लागूनच असलेल्या पावनगडावरील (PavanGad) अतिक्रमण प्रशासनानं हटवलं आहे. पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनानं हटवले आहे. किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंदूत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
पावनगडावरील अतिक्रमण कारवाई मध्यरात्री दोन वाजता सुरू करण्यात आली. मध्यरात्री सुरू झालेली कारवाई तब्बल सात तासानंतर सकाळी नऊ वाजता संपली. किल्ले पावनगडावरील अनाधिकृत अतिक्रमण केलेले मदरसा हटवण्यात आले आहेय . हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखासह महत्त्वाच्या अधिकारी किल्ले पावनगडावर रात्रीपासून तळ ठोकून आहे. कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे.
1989 पासून मदरसा कार्यरत
पावनगडावर ही मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली आहे. पावनगडाकडे जाणारे सर्व मार्ग सध्या बंद करण्यात आले आहे. पावनगडावरील ही अनाधिकृत मदरसा 1989 पासून होता . त्यानंतर या मदरशावर कारवाई झाल्यानंतर हा मदरसा तीन ते चार वर्षे बंद करण्यात आला होता. पुन्हा एकदा मदरसा चालू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मदरशामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहारमधील मुले शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या मदरशातील मुलांना हलवण्यात आले त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पावनगडाचे इतिहासात विशेष महत्त्व
पन्हाळ गडाच्याशेजारी चार किलोमीटर पावनगड आहे. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. तो पन्हाळा गडाचा संरक्षक गड मानला जातो. शत्रूला चकवा देण्यासाठी हा गड बांधण्यात आला आहे. अनेक इतिहासाचे दाखले देखील या गडावर मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाला विशेष महत्त्व आहे. अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी या संदर्भात आंदोलन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून मदरसा हटवण्याची मागणी करण्यात येत होती. सध्या या परिसरात कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे