एक्स्प्लोर

Kolhapur Illegal Sex Determination Racket : बेकायदेशीर गर्भलिंग निदान टोळीतील दोन मुख्यसूत्रधारांना बेड्या ठोकल्या

Kolhapur Illegal Sex Determination Racket : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग रॅकेटप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Kolhapur illegal sex determination racket : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग रॅकेटप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. राधानगरी पोलिसांनी दिलीप बाळासो पवार (वय 37 वर्षे) आणि विजय बाळासो पवार (वय 40 वर्षे) या सख्ख्या भावांना अटक केली आहे. पवार बंधू गर्भलिंग निदान टोळीतील मुख्य सूत्रधार आहेत. राधानगरीच्या पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्यासह एस. एम. यादव, उपनिरीक्षक विजयसिंह घाटगे, के. डी. लोकरे, हवालदार बी. डी. पाटील, सुरेश मेटिल, सचिन पारखे, गजानन गुरव, रोहित खाडे, आदींच्या पथकाने अटकेची कारवाई केली. 

डिजिटल सोनोग्राफी मशीन जप्त 

आरोपी पवार बंधूंकडून सुमारे 6 लाख रुपये किमतीचे डिजिटल सोनोग्राफी मशीनही पोलिसांनी जप्त केले आहे. मशीन उपलब्ध करुन देण्यात काही डॉक्टर किंवा औषध वितरकांचा सहभाग असावा, असा पोलिसांना संशय आहे. आतापर्यंत दोन सोनोग्राफी मशीन पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पहिले भुदरगड पोलिसांनी जप्त केला असून ते हयात नसलेल्या डॉक्टरकडून विकत घेतल्याची माहिती आहे. या दोन्ही डॉक्टरांचा स्त्री भ्रूणांच्या गर्भपातातही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या ताब्यातून गर्भपातासाठी वापरलेली औषधेही जप्त करण्यात आली आहेत.

अन्य एक संशयित डाॅक्टराला अटक 

बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भपात करण्याऱ्या टोळीतील आणखी एक संशयिताला भुदरगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉक्टर आनंद महादेव चौगले (वय 47 वर्षे) असे त्या संशयिताचे नाव आहे. आनंद चौगुले हा बीएचएमएस असून सदलगे गावात दवाखाना आहे. दवाखान्यात आलेल्या गरजू गर्भवती महिलांना या टोळीकडे पाठवत होता. त्याचा या टोळीत सहभाग असल्याचे लक्षात आल्याव सदलगे गावात पथक पाठवण्यात आले होते. रविवारी रात्री आनंदला अटक करुन गारगोटीत आणण्यात आले.

तत्पूर्वी, बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी कर्नाटकातील आणखी एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अनिल मल्लू कुंभार (वय 37 रा.नाईंग्लज, ता. चिकोडी जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. गर्भलिंग निदान प्रकरणात मुख्य संशयित बोगस डॉक्टर विजय कोळस्करसह एजंट, नर्स आणि बोगस डाॅक्टरांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत डॉक्टर बाबुराव दत्तू पाटील (वय 52, रा. बामणे, ता. कागल) सोनाळी येथील सागर शिवाजी बचाटे दिगंबर मारुती किल्लेदार, नर्स शीला शामराव माने (वय 40, दोघेही रा. तिटवे, ता. राधानगरी) सर्जेराव अशोक पाटील आणि हातकणंगले तालुक्यातील रुई येथील अमोल सुर्वे या एजंटना यापूर्वी अटक केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif On Satej Patil : कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
Hasan Mushrif and Satej Patil: मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी : आमच्या सभेत मी रागातून बोललो, ती चूक झाली, हसन मुश्रीफांना उपरती, चंद्रकांत पाटलांच्या धमकीबद्दल म्हणाले...
आमच्या सभेत मी रागातून बोललो, ती चूक झाली, हसन मुश्रीफांना उपरती, चंद्रकांत पाटलांच्या धमकीबद्दल म्हणाले...
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident Parinay Fuke Son: आमदार परिणय फुकेंच्या मुलाने दारुच्या नशेत अनेकांना चिरडलं, एकाचा मृत्यू, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
आमदार परिणय फुकेंच्या मुलाने दारुच्या नशेत अनेकांना चिरडलं, एकाचा मृत्यू, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
दिव्यांगांच्या डब्यात नराधमाचा तरुणीला बॅड टच, जाब विचारताच लोकलसमोर ढकललं, ट्रॅकवर झोपल्यामुळे जीव वाचला, हात तुटला; तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी !
दिव्यांगांच्या डब्यात नराधमाचा तरुणीला बॅड टच, जाब विचारताच लोकलसमोर ढकललं, ट्रॅकवर झोपल्यामुळे जीव वाचला, हात तुटला; तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी !
NCP Merger: परवा आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडले, आज थेट विरोधात दंड थोपटले, विलिनीकरण नकोच, रोहित पवारांची आक्रमक भूमिका, पुढचा प्लॅन काय ?
परवा आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडले, आज थेट विरोधात दंड थोपटले, विलिनीकरण नकोच, रोहित पवारांची आक्रमक भूमिका, पुढचा प्लॅन काय ?
NCP Merger: मोठी बातमी : विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवारांची भेट का मागितली? फडणवीसांच्या भेटीवेळी काय झाली चर्चा, सुनील तटकरेंचं उत्तर, म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवारांची भेट का मागितली? फडणवीसांच्या भेटीवेळी काय झाली चर्चा, सुनील तटकरेंचं उत्तर, म्हणाले...
Mumbai Crime News: आईला भेटून परतली; गर्दीमुळे घाईघाईत जनरल डब्यात चढली, बापाच्या वयाच्या व्यक्तीकडून किळसवाणं कृत्य, विरोध करताच ट्रेनमधून खाली ढकललं, नायगाव स्टेशन प्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी
आईला भेटून परतली; गर्दीमुळे घाईघाईत जनरल डब्यात चढली, बापाच्या वयाच्या व्यक्तीकडून किळसवाणं कृत्य, विरोध करताच ट्रेनमधून खाली ढकललं, नायगाव स्टेशन प्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी
पाण्यासाठी नागरिकांचे आमदारांना खडे बोले, चंद्रकांत पाटलांनी झेडपी अध्यक्षांना सुनावले; माफी मागत तातडीने काम फत्ते
पाण्यासाठी नागरिकांचे आमदारांना खडे बोले, चंद्रकांत पाटलांनी झेडपी अध्यक्षांना सुनावले; माफी मागत तातडीने काम फत्ते
Embed widget