एक्स्प्लोर

Kolhapur Rain: कोल्हापूर जिल्ह्याला सलग दोन दिवस वळीव पावसाने झोडपले; अनेक गावांमध्ये बत्ती गुल, घरांची पडझड

कोल्हापूर शहरात मंगळवारी सायंकाळी सहानंतर जोरदार वळीव पावसाला सुरुवात झाली. दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. हवामान विभागाकडून वळीव पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता

Kolhapur Rain: कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला सलग दोन दिवस वळीव पावसाने झोडपून काढले. वळीव पावसाने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे, तसेच उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नद्यांची पात्र कोरडी पडल्याने ऊसावर विपरित परिणाम झाला होता. या पावसाने ऊसासह अन्य उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे.वीजांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह वळीव पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. वीजेचे खांबही मोडून पडले आहेत. अनेक घरांचे छप्पर उडाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सर्वदूर वळीव पावसाने झोडपले 

कोल्हापूर शहरात मंगळवारी सायंकाळी सहानंतर जोरदार वळीव पावसाला सुरुवात झाली. दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. हवामान विभागाकडून वळीव पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सुमारे तासभर झालेल्या पावसाने पादचाऱ्यांसह सर्वांचीच दैना झाली. वादळी वाऱ्यामुळे करवीर तालुक्यातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या, तर काही ठिकाणी पूर्णत: झाडे मोडून वीजेच्या तारांवर पडल्याने अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला आहे. 

चंदगड शहरासह तालुक्यात दुसऱ्या दिवशी सलग वळीव पावसाने हजेरी लावली. चंदगडसह हिंडगाव, फाटकवाडी, इब्राहीमपूर, गवसे, पुंद्रा, कानूर, कोकरे, अडुरे परिसरातही पाऊस झाला. शिरोळ तालुक्यातही वळीव पावसाने हजेरी लावली. शहरास तालुक्यातील शिरोळ, घालवाड, कुटवाड, कनवाड शिरटीमध्ये पाऊस झाला. गडहिंग्लज शहरासह तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील अन्य गावांना पावसाने झोडपून काढले. कागल तालुक्याला पावसाने झोडपून काढले. मुरगूडमध्येही चांगलाच बरसला. पावसाने आठवडी बाजाराला फटका बसला. बाजार करुन परतणाऱ्यांची व व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गगनबावडा तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
Gokul Chairman Election 2026 Hearing: कोर्टाने महायुतीच्या वकीलांना झापलं, वॉर्निंगही दिली; गोकुळमधील 4 शासननियुक्त संचालक निर्णयावरील सुनावणीत काय घडलं?
कोर्टाने महायुतीच्या वकीलांना झापलं, वॉर्निंगही दिली; गोकुळमधील 4 शासननियुक्त संचालक निर्णयावरील सुनावणीत काय घडलं?
Kolhapur Hit And Run Case : अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
Embed widget