एक्स्प्लोर

Mahaswayam Rojgar Registration Portal : नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे एकाच व्यासपीठावर! महाराष्ट्र सरकारच्या महास्वंयम पोर्टलवर नोंदणी कशी करायची माहीत आहे का?

नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून महास्वंयम रोजगार नोंदणी पोर्टल (Mahaswayam Rojgar Registration Portal) निर्मिती करण्यात आली आहे. 

Mahaswayam Rojgar Registration Portal : राज्यात बेरोजगारीचे किती भीषण वास्तव आहे याचा अंदाज पोलिस भरतीतून आला आहे. जवळपास शंभरावर अर्ज एका जागेसाठी अर्ज दाखल झाले आहेत. उच्चशिक्षितही पोलिस शिपाई भरतीच्या रांगेत दिसून आले. दरम्यान, राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी निर्माण करून देण्यासाठी नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून महास्वंयम रोजगार नोंदणी पोर्टल (Mahaswayam Rojgar Registration Portal) निर्मिती करण्यात आली आहे. 

महास्वंयम रोजगार नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून (Mahaswayam Rojgar Registration Portal) राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत केली जाते. दरम्यान, ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे अडचणीचे असेल किंवा सुविधा नसल्यास ऑफलाईन अर्ज करू शकतात.जवळच्या एम्पलॉयमेंट एक्स्चेंजला भेट देऊन माहिती भरता येईल. 

कमी कालावधीचे प्रशिक्षण असल्यास महाराष्ट्र राज्य स्किल डेव्हलपमेंट सोसायटीकडून प्रशिक्षण दिले जाते. जास्त कालावधीचे प्रशिक्षणासाठी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, यांच्या माध्यमातून दिले जाते. रोजगार मार्गदर्शन व चर्चा यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता संचालनालय यांच्याकडून सहकार्य केले जाते. स्टार्ट अप आणि इनोव्हेशनसाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून मदत केली जाते. कर्जासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून सहाय्य केले जाते. 

Mahaswayam Rojgar Registration Portal : नोंदणीसाठी पात्रता आणि लागणारी कागदपत्रे

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरिक असावा
  • अर्जदाराचे वय कमीत कमी 14 वर्ष पूर्ण 
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका
  • कौशल्य प्रमाणपत्र असल्यास 
  • महाराष्ट्राचा रहिवासी दाखला
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

 Maharashtra Mahaswayam Portal : ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

  • Maharashtra Mahaswayam Portal च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 
  • होमपेजवर तुम्हाला “रोजगार” हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. रोजगार ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 'नोंदणी' हे पेज ओपन होईल. उमेदवार Rojgar
  • Mahaswayam Registration लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकतो.
  • या पेजवर कौशल्य / शिक्षण / जिल्हा प्रविष्ट करुन नोकरीच्या सूचीतून संबंधित नोकऱ्या शोधू शकतात.
  • या पेजवरील जॉब सीकर लॉगिन फॉर्ममध्ये "नोंदणी" हा पर्याय दिसेल, आपल्याला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • 'नोंदणी' पर्यायावर क्लिक केल्यानंतर नोंदणी फॉर्म ओपन होईल. या नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी 
  • अर्जदाराला आपल्या आधार कार्डनुसार आवश्यक माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर व शेवटी दिलेला कॅप्चा कोड भरल्यानंतर next बटणावर क्लिक करा. 
  • पुढील पेजवर दिसणार्‍या बॉक्समध्ये आपल्या मोबाईलवर पाठविलेला ओटीपी भरावा व ओटीपी भरल्यानंतर “कन्फर्म” बटणावर क्लिक करा.
  • यानंतर new job seeker हे पेज ओपन होईल. या पेजवर वैयक्तिक माहिती भरावी. 
  • त्यानंतर नोंदणी केलेला मोबाईल नंबरवर एसएमएस तसेच ईमेल येईल. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे. अशा प्रकारे आपली नोंदणी पूर्ण होईल.
  •  नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला  रजिस्टर आयडी व पासवर्ड मिळेल
  • https://rojgar.mahaswayam.gov.in
  • Rojgar Mahaswayam नोंदणी व लॉगिन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदार महास्वंयम वेब पोर्टलवर नोकरी निवडू शकतो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM : 30  सप्टेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 PM: 30 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti Seat Sharing Formula : जागावाटप, उमेदवारांबाबत नेमकं काय ठरलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget