एक्स्प्लोर

Kirit Somaiya on Hasan Mushrif : किरीट सोमय्या उद्या कोल्हापुरात; कोणाची भेट घेणार याचीही माहिती दिली

माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर (Hasan Mushrif ED Raid) आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) उद्या (23 फेब्रुवारी) कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर येत आहेत.

Kirit Somaiya on Hasan Mushrif : माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर (Hasan Mushrif ED Raid) आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) उद्या (23 फेब्रुवारी) कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकार निबंधक, बँक आणि कंपनीचे सदस्य, शेतकरी आणि अन्य अधिकारी यांची भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्यांकडून हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले जात आहेत. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. दुसरीकडे जिल्हा बँकेच्या आणखी तीन संचालकांचे फोन नंबर ईडीकडून मागवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

जिल्हा बँकेच्या आजी माजी संचालकांची चौकशी 

सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला चुकीच्या पद्धतीने पैसे पुरवल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा बँकेतून गडहिंग्लज कारखाना चालवण्यास घेतलेल्या ‘ब्रिक्स’ कंपनीला केलेला अर्थपुरवठाही वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात  मुश्रीफ यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि घोरपडे कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर जिल्हा बँकेवरही छापेमारी केली आहे. तसेच ‘ब्रिक्स’ला केलेल्या कर्जपुरवठ्याबद्दल बँकेच्या आजी-माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे या तिघांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेणाऱ्या ‘ब्रीक्स’ कंपनीच्या कर्जप्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. बँकेच्या मागील संचालक मंडळातील या कर्जप्रकरणाशी संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यापूर्वी, ईडीकडून कोल्हापूर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर आणि राजू खाडे यांना समाज बजावून ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यापूर्वी, 11 जानेवारी रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना 2013-14 मध्ये ‘ब्रीक्स’ कंपनीने भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला होता. 2015 पर्यंत त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्जपुरवठा घेतल्यानंतर 2015 नंतर त्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली. या कालावधीत कंपनीने घेतलेल्या कर्जाबाबत ‘ईडी’चा आक्षेप आहे. 

हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या जामीनाला विरोध 

दुसरीकडे ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ईडीकडून मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करण्यात आला आहे. ईडीने तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला कडाडून विरोध करताना म्हटले आहे की, त्यांनी चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेलं नाही. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर झालेले नाहीत. जामीन दिल्याने चौकशीवर परिणाम होईल, असेही ईडीने म्हटले आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 25 March 2025Sanjay Raut PC Nashik : देवेंद्र फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं,  राऊतांचा मोठा खुलासाBeed Crime Satish Bhosale: पोलिसांकडून खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट, बिर्याणी अन् मोबाईलमध्ये अनलिमिटेड टॉकटाईमTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
MP Salary Appraisal: खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
Eknath Shinde on Kunal Kamra : कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुपारी घेऊन...
कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुपारी घेऊन...
Sanjay Raut: आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Embed widget