एक्स्प्लोर
Kolhapur District Nagar Palika Election: कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि तीन नगरपंचायतीमध्ये कोण कुठं आघाडीवर? भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी
Kolhapur District Nagar Palika Election: कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 तीन नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी होत आहे.

Kolhapur District Nagar Palika Election
Source : ABP Majha
Kolhapur District Nagar Palika Election: कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 तीन नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी होत आहे. कोल्हापुरात भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी झाला आहे. चंदगड नगरपंचायतीमध्ये सुनील कावनेकर यांचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते कावनेकर यांच्या प्रचारासाठी आले होते.
- कोल्हापूरच्या कागलमध्ये पहिला कल हाती
- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आघाडीवर
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सविता माने आघाडीवर
- मुरगुड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या सुहासिनी प्रवीणसिंह पाटील आघाडीवर
- शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुहासिनी पाटील आघाडीवर
- चंदगड नगरपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीवर
- भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कावनेकर आघाडीवर
- जयसिंगपूर मध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर आघाडी
- संजय पाटील यड्रावकर 2800 मतांनी आघाडीवर
- जयसिंगपूर मध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर विरोधात सर्वपक्षीय पॅनल
- गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे महेश तुर्बतमठ फेरीत 1765 मतांनी आघाडीवर
- हातकणंगले नगरपंचायत काँग्रेसचा पहिला उमेदवार विजयी नेहाल सनदी
- सात प्रभाग अमर वरूटे कॉग्रे स विजयी
- प्रभाग क्रमांक पाच महेश पाटील उबानठा विजय
- गिरीश इंगवले काँग्रेस प्रभाग क्रमांक दोन विजयी
- सुभाष गोरे अपक्ष प्रभाग क्रमांक तीन विजयी
- सुप्रिया अभिजीत इंगवले प्रभाग क्रमांक दोन काँग्रेस विजय
- प्रभाग क्रमांक रोहिणी खोत अपक्ष नगरसेवक म्हणून विजय विजयी
- कुरुंदवाड पहिल्या फेरी अखेर राजर्षी शाहू आघाडीच्या ( शिवसेना शिंदे गट) नगराध्यक्ष उमेदवार मनीषा डांगे 1238 मतांनी आघाडीवर
- गडहिंग्लज पालिकेच्या निवडणुकीत 22 जागांच्यापैकी 20 जागांवर राष्ट्रवादीची एक हाती घोडदौड सुरू
- जनता दल, जनसुराज्य, भाजप महायुतीला केवळ 2 जागांवर आघाडी
- नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवारही मोठ्या आघाडीवर
चंदगड नगरपंचायत
- राजर्षी शाहू विकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी
- तर भाजप शिवसेना युतीचे उमेदवार 3 विजयी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नगरपंचायत साठी आले होते प्रचाराला
- भाजप शिवसेनेला चंदगड मध्ये सहा ठिकाणी धक्का
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























