एक्स्प्लोर

Shahuwadi : 'पाणीदार' कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी या तालुक्याच्या गावात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट!

पाणीदार जिल्हा म्हणून परिचित असलेल्या कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील शाहूवाडी (Shahuwadi News) या तालुक्याच्या गावीच पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे.

Shahuwadi : पाणीदार जिल्हा म्हणून परिचित असलेल्या कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील शाहूवाडी (Shahuwadi News) या तालुक्याच्या गावीच पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट (Shahuwadi water crisis) आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पायपीठ करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून पाणी नसल्याने पुरता बोजवारा उडाला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांवर टँकरने पाणी घेण्याची वेळ आली आहे. तब्बल साडे तीनशे रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत टँकरसाठी मोजावे लागत आहे. पाणी मिळत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

शाहूवाडी (Shahuwadi) तालुका दुर्गम आणि विकासाच्या बाबतीत कोसो दूर असलेल्या तालुका समजला जातो. त्यामुळे तालुक्याचे गाव असूनही पायाभूत सुविधांची वाणवा आहे. त्यामुळे नागरिकांना शेकडो समस्यांना सामोरं जावं लागत आहे. सध्या गावासाठी पाणीपुरवठा (Shahuwadi water crisis) करणारी शाळी नदीवरील कोळगांव हद्दीतील व आंबर्डी नदीवरील नळपाणी योजना गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी अपुरी पडत आहे. त्यामूळे संपूर्ण गावात एका दिवसाआड अपुरा पाणी पुरवठा सुरु आहे. गेल्या 10 दिवसांपासून तो सुद्धा बंद झाला आहे. त्यामुळे पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीवरही बहिष्कार

गेल्या अनेक वर्षांपासून शाहूवाडी ग्रामस्थांनी विविध माध्यमातून शाहूवाडी नगरपंचायत करावी या मागणीसाठी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता. राज्य सरकारकडून तालुका ठिकाणच्या गावांना नगरपंचायत देण्याचा निर्णय आठ वर्षांपूर्वी घेतला होता. त्या निर्णयाने शाहूवाडी गावाला नगरपंचायत मंजूर असूनही कार्यवाही झालेली नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. 

दरम्यान, शाहूवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेनंतर खासदार धैर्यशील माने (dhairyasheel mane on shahuwadi) यांनी आपण यासाठी पाठपुरावा करत असून यश नक्की येईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. शाहूवाडीला नक्की नगरपंचायत होईल, आचारसंहितेमुळे राज्य सरकारला निर्णय घेण्यास अडचण येत आहे. येणाऱ्या काळात शाहूवाडीकरांच्या मनासारखा निर्णय झालेला असेल असेही म्हटले होते. मात्र, या घोषणेनंतर अडीच महिन्यांनंतरही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

पती गाढ झोपेत असतानाच पत्नीने केला घात, पतीला जागेवरच संपवलं, धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं 
पती गाढ झोपेत असतानाच पत्नीने केला घात, पतीला जागेवरच संपवलं, धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं 
Satej Patil: 'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर
गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर,

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
राज्य सरकारने दुष्काळाचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा, पलूस तालुक्यासह जत आटपाडी खानापूरला योग्य पाणी मिळावं; आमदार विश्वजित कदमांची मागणी
राज्य सरकारने दुष्काळाचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा, पलूस तालुक्यासह जत आटपाडी खानापूरला योग्य पाणी मिळावं; आमदार विश्वजित कदमांची मागणी
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
Rahul Gandhi: राहुल गांधींची मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता, अमित शाहांविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप, अजूनही पाच खटले प्रलंबित
राहुल गांधींची मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता, अमित शाहांविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप, अजूनही पाच खटले प्रलंबित
Eknath Shinde Nashik: 'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
आदित्य ठाकरेंच्या ताफ्यात युवक शिरला; हातातील बोर्डने लक्ष वेधले, सह्याद्रीचं जंगल वाचवण्याची आर्त हाक
आदित्य ठाकरेंच्या ताफ्यात युवक शिरला; हातातील बोर्डने लक्ष वेधले, सह्याद्रीचं जंगल वाचवण्याची आर्त हाक
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
Mumbai Local Train Central Railway: मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
Embed widget