एक्स्प्लोर

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या मुलांच्या अटकपूर्ण जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्ण जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे.

Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्ण जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. तूर्तास मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांविरोधात कारवाई करणार नसल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. ईडीकडून मुश्रीफ यांच्याविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

मुश्रीफ यांची मुलं नाविद, आबिद आणि साजिद यांच्या अटकपूर्व जामीनाला ईडीकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्या मुलांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा, अमित देसाई आणि प्रशांत पाटील बाजू मांडत आहेत. मुलांकडून राजकीय हेतूनं अटकेच्या धमक्यांचा वापर होत असल्याचे म्हटले आहे. ईडीने तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला कडाडून विरोध करताना त्यांनी चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलं नसल्याचे म्हटले आहे. चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर झालेले नाहीत. जामीन दिल्यास चौकशीवर परिणाम होईल, असा दावा ईडीने केला आहे. 

हसन मुश्रीफांची गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव

दुसरीकडे मुश्रीफ यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडी प्रकरणात गोवण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे. याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई तसेच आरोपपत्र दाखल करू न देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. हसन मुश्रीफांविरोधात 40 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करत 23 फेब्रुवारी रोजी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक कुलकर्णी यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. हे आपल्याविरोधातील षड्यंत्र असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवरून ईडी प्रकरणात अडकवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे याचिकेत म्हटले आहे. 

हसन मुश्रीफांविरोधात फिर्याद देणाऱ्यासह 16 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

दुसरीकडे, मुश्रीफ यांच्याविरोधात फिर्याद देणाऱ्यासह 16 जणांविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुरगूड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. सभासदांची कोणतीही संमती न घेता आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फिर्याद दिल्याप्रकरणी विवेक विनायक कुलकर्णीसह 16 जणांवर मुरगूड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हसन मुश्रीफ यांनी 40 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार

दरम्यान, संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी आणि इतर लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी मुश्रीफ यांच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 40 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांनी दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्रीफ यांनी 2012 मध्ये कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक होण्याचे आवाहन केले होते. त्यातून लोकांकडून 10 हजार रुपयांप्रमाणे शेअर भांडवल घेतले आणि सुमारे 40 कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

इतर मह्त्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget