Hasan Mushrif: आम्ही लंडनवारीमध्ये असताना राज्यसभेचे भाजपचे खासदार आणि शिवसेनेचे कोल्हापूरचे विद्यमान आमदार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या (Kolhapur Municipal Corporation Election) जागा वाटून घेतल्या आहेत, एकाने 80 जागा वाटून घेतल्या आणि दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या, असा खोचक टोला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांना लगावला. हे दोन्ही पक्ष महापालिकेच्या सत्तेत कुठंही दिसत नव्हते. गेली 25 वर्ष आम्ही सत्तेत होतो हे त्यांना लक्षात घ्यावच लागेल, आम्हाला जम्यात धरत नाही म्हणून हे बोलावं लागतं, असे मुश्रीफ म्हणाले. मनपा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Local Body Elections Maharashtra) लगभग सुरु झाली असून त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुद्धा होत चालले आहेत. 

Continues below advertisement

कासवाच्या गतीने कशी सत्ता घ्यायची हे आम्हाला माहिती (Hasan Mushrif on Kolhapur)

कोल्हापूर मनपाच्या महायुतीच्या जागावाटपावरून हसन मुश्रीफ यांनी खोचक शब्दात भाष्य केले. ते म्हणाले की, आम्हाला कुठेही जमेत धरलं नाही. त्यामुळे मी म्हणालो कासवाच्या गतीने कशी सत्ता घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. कुणी काहीही म्हटलं तरी महानगरपालिका आम्हाला ताकतीने लढावी लागेल. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे मी काही भाकीत करणार नाही त्या ठिकाणी कदाचित बंडखोरी होईल, पण आमचं ठरलं आहे ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती करायची ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढायचं, असे मुश्रीफ यांनी सांगितले. महापालिकावर युतीचा झेंडा फडकवायचा आहे. यामध्ये सगळ्यात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील अशी तयारी आम्ही केली आहे. ज्यांचे नगरसेवक होते त्या जागांचे पहिल्यांदा वाटप होईल आणि त्यानंतर उरलेल्या जागांवर चर्चा करून वाटप होईल, असे ते म्हणाले. 

त्यामुळे भाजपला राग येणारच (Hasan Mushrif on BJP) 

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही संबंध नसल्याचे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना अनेकवेळा सल्ला दिला आहे.  मुख्यमंत्र्यांचा गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याशी संबंध जोडणे पूर्णपणे चुकीचा असल्याचे ते म्हणाले. मोर्चा पडळकर यांच्या विरोधात असताना मुख्यमंत्र्यांवर टीका झाली. त्यामुळे सहाजिकच भारतीय जनता पक्षाला राग येणार, असे त्यांनी सांगितले. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या