Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीजवळ कबनूर (ता. हातकलंगले) ग्रामपंचायत कार्यालयासमोरच लव्ह मॅरेजला मदत केल्याच्या रागातून प्राणघातक हल्ला दाम्पत्यावर केला. यामध्ये हाताचं बोट तुटलं आहे. या खुनी आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. ग्रामपंचायत कार्यालयसमोरच चौघा जणांनी कोयत्याने हल्ला केल्याने प्रमोद बाबासो शिंगे यांच्या हाताचं बोट तुटलं.  त्यांची पत्नी अश्विनी शिंदे देखील जखमी झाली आहे. 

लव्ह मॅरेजला मदत केल्याच्या कारणातून खुनी हल्ला

या गुन्ह्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. लव्ह मॅरेजला मदत केल्याच्या कारणातून खुनी हल्ला करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांनी सीसीटीव्ही सुद्धा फोडत चार चाकी वाहनाची तोडफोड करत दहशत माजवली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. या घडलेल्या घटनेनंतर इचलकरंजीमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी हत्यारे जप्त केली आहेत. प्रमोद यांचे तुटलेले बोटही सापडले. हल्लेखोरांपासून सुटका करून घेत कारमध्ये बसल्याने जीव बचावला.  

प्रमोद यांच्या खांद्यावर, हातावर वार

पोलिसांनी जमीर हासीम मुलाणी, आर्यन जमीर मुलाणी (रा. जांभळी, ता. शिरोळ) यांच्यासह चौघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद शिंगे याच्या मित्राने प्रेमविवाह केला आहे. मुलीच्या विवाहात मदत केल्याच्या कारणावरून जमीर मुलाणी व त्यांच्या मुलाचा शिंगे यांच्यावर राग होता. दरम्यान, शनिवारी सकाळी प्रमोद आणि त्यांची पत्नी चारचाकी वाहनातून कामानिमित्त कबनूर ग्रामपंचायतीमध्ये आले होते. काम संपल्यावर ते परत कारजवळ आले आल्यानंतर तोंडाला स्कार्प बांधून आलेल्या चौघांनी कोयत्याने हल्ला केला.  हल्लेखोरांनी प्रमोद यांच्या खांद्यावर, हातावर वार केले. या प्राणघात हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताचे बोट तुटले. पत्नी हल्लेखोरांना रोखण्यासाठी आल्या असता, त्यांच्यावरही हल्लेखोरांनी वार केल्याने जखमी झाल्या. यावेळी दाम्पत्य कारमध्ये बसल्याने हल्लेखोरांनी काचा फोडून तोडफोड केली.   

इतर महत्वाच्या बातम्या