एक्स्प्लोर

Kolhapur Crime : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा भरारी पथकाकडून गोवा बनावटीचा 5 लाखांचा मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने (Kolhapur News) छापेमारी करत गोवा बनावटीचा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. छापेमारीची कारवाई करून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

Kolhapur Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने (Kolhapur News) छापेमारी करत गोवा बनावटीचा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर छापेमारीची कारवाई करून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अनिकेत अरूण पाटील (वय 32, रा. प्लॉट क्र. 32/A, शाहू मिल कॉलनी, राजारामपुरी, कोल्हापूर) आणि इंद्रजित संताजीराव घोरपडे (वय 45, रा.856 ई वॉर्ड, साईनाथ कॉलनी, लाईन बाजार, कोल्हापूर) अशी दोघांची नावे आहेत. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून शनिवारी (18 फेब्रुवारी) ही कारवाई करण्यात आली. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू असल्याचे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

भरारी पथकाने गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अनिकेत आणि इंद्रजितला ताब्यात घेत कोल्हापुरातील (Kolhapur News) शाहू मिल कॉलनी तसेच पांजरपोळ इंडिस्ट्रिज एरिया या दोन ठिकाणांवर छापेमारी केली. त्यांच्या राहत्या घरात बेकायदा गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठया प्रमाणात साठा सापडला. आरोपींच्या राहत्या घराची कसून तपासणी केली असता सदर घरामध्येमध्येही गोवा राज्य निर्मित उच्च प्रतिच्या विदेशी मद्याने भरलेले 180 व 750 मिलीचे विविध ब्रँडचे 57 बॉक्स इतके मद्य सापडले. निव्वळ मद्याची किंमत 4,93,680 रुपये इतकी आहे. यामध्ये पकडलेल्या आरोपींसह इतर साथीदारांचा सहभाग आहे का? याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. 

सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील, निरीक्षक संभाजी बरगे, निरीक्षक अंकुश मते, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, एन. पी. रोटे, बबन पाटील, सचिन लोंढे, जवान सचिन काळेल, मारुती पोवार, राजेंद्र कोळी, जय शिनगारे, जयदीप ठमके, योगराज दळवी, श्रीमती सविता देसाई यांनी सहभाग घेतला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget