एक्स्प्लोर

Comrade Govind Pansare Case : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण;10 संशयितांवर आरोप निश्चिती

Comrade Govind Pansare Case : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट आणि हत्या प्रकरणी 10 संशयितांवर आरोप निश्चिती करण्यात आली. दोषनिश्चिती झाल्याने पानसरे हत्या खटल्याच्या सुनावणीला वेग येणार आहे. 

Comrade Govind Pansare Case : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट आणि हत्या प्रकरणात 10 संशयितांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील खटल्याची कारवाई थांबवू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) कोल्हापूर सत्र न्यायालयाला (Kolhapur Session Court) दिल्यानंतर आजपासून सुनावणीला प्रारंभ झाला. 10 संशयितांमध्ये समीर गायकवाड, वीरेंद्र सिंह तावडेसह अन्य संशयितांचा समावेश आहे. दोषनिश्चिती झाल्याने पानसरे हत्या खटल्याच्या सुनावणीला वेग येणार आहे. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होईल. 

दरम्यान, पानसरे कुटुबीयांनी केलेल्या मागणीनंतर काही महिन्यांपूर्वीच हा तपास एसआयटीकडून (SIT) एटीएसकडे (ATS) देण्यात आला आहे. तेव्हा तातडीनं यामध्ये नवी माहिती समोर येणं कठीण असल्याने एसआयटीनं तयार केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर उभ्या राहिलेल्या खटल्याची कारवाई सुरू करा, असे निर्देश हायकोर्टानं जारी केले होते. 

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्येनंतर एसआयटीने तपास करून 12 संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. एटीएसकडूनही तपास सुरू आहे. दरम्यान, गुन्ह्यातील 10 संशयितांवर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर दोषनिश्चिती करण्यात आली. सर्व संशयितांनी आरोप नाकबूल केले आहेत. त्यांच्यावर दोषनिश्चिती करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. पुढील सुनाणीमध्ये गुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदारांची यादी सादर केली जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली आहे. 

दरम्यान,  उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुढील 1 फेब्रुवारीच्या सुनावणीत आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला दिले आहेत. या कटात सामील मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर काही ज्येष्ठ पत्रकारांसह सुमारे 40 जणांची नावं होती, अशी माहिती पानसरे कुटुबियांचे वकील अॅड. अभय नेवगी यांनी हायकोर्टात दिली होती. त्यामुळे या कटाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी न्यायालयानं हा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

20 फेब्रुवारी 2015 रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली होती. पानसरे तपासातील एसआयटीच्या धीम्या गतीमुळे हायकोर्टानं कुटुंबियांच्या विनंतीनुसार काही महिन्यांपूर्वी हा तपास एटीएसकडे वर्ग केला गेला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget