एक्स्प्लोर

आमदार पी. एन. पाटील अनंतात विलीन; हजारोंच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Cogress MLA P N Patil passed Away : सडोली खालसा या मुळ गावी पाटील यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल पाटील यांनी पाटील यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी. एन. पाटील आज (23 मे) अनंतात विलीन झाले. सडोली खालसा या मुळ गावी पाटील यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल पाटील यांनी पाटील यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. रविवारी राहत्या घरी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. यानंतर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तातडीची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर पण गंभीर होती. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूची झुंज अपयशी ठरली. 

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्य सरकारच्या वतीने उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कारावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे उपस्थित होते. लातूरचे आमदार धीरज देशमुख सुद्धा उपस्थित होते. सांगलीचे विशाल पाटील देखील उपस्थित होते. आज पहाटे साडे पाचच्या सुमारास पाटील यांची प्राणज्योत मालवली. आमदार पाटील यांच्या मुळ गावी सडोली खालसामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला आमदार पी. एन. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची सूचना दिल्या होत्या.  

कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात अंत्यदर्शन 

पाटील यांचे पार्थिव कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी श्रीमंत शाहू महाराज, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

पाटील यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार 

काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शन झाल्यानंतर पाटील यांचे पार्थिव सडोली खालसा या त्यांच्या मुळ गावी नेण्यात आले. यावेळी पाटील यांच्यावर प्रेम करणारा हजारोंचा जनसमुदाय अत्यंदर्शनासाठी आला होता. यावेळी जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. 

नेत्यांकडून पाटील यांच्या आठवणींना उजाळा 

पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराज, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, धीरज देशमुख, माजी आमदार चंद्रदीप नरके आदींनी भावना व्यक्त केल्या. यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष आबाजी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  आमदार अमित देशमुख यांनी वडिल स्वर्गीय विलासराव देशमुख आणि पी. एन. पाटील यांच्या मैत्रीच्या आठवणी जागवल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Embed widget