एक्स्प्लोर

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित; 5 फेब्रुवारीला मतदान

मराठी कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर भागधारकांची सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचे वेळापत्रक कोल्हापूरच्या उप धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जाहीर केले आहे.

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal : मराठी कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर भागधारकांची सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचे वेळापत्रक कोल्हापूरच्या उप धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जाहीर केले आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करून निवडणुकीची प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल.

5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. यामुळे उमेदवारांना महाराष्ट्रभर पसरलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. संस्थेची नवीन घटना अद्याप स्वीकारली जाणे बाकी असल्याने, पूर्वीच्या घटनेनुसार आणि ठरावाद्वारे निश्चित केलेल्या मतदारांची संख्या केवळ निवडणुकीसाठी वैध असेल.

दरम्यान, अखिल भारतीय चित्रपट महामंडळातील तमाशा सुरु आहे. दावे प्रतिदावे करत दोन्ही गटाकडून निवडणूक जाहीर करण्यात आल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी तगडा हादरा देत निवडणूक रद्द केली होती. धर्मादाय आयुक्त प्रदीप चौधरी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्मादाय निरीक्षक आसिफ शेख यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक नियंत्रक म्हणून शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती केली आहे. 

दोन्ही गटांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर 

चित्रपट महामंडळातील दोन गटातील धुसफूस सुरुच असल्याने मेघराज राजेभोसले यांनी आपणच महामंडळाचे अध्यक्ष असल्याचा दावा करत महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. निवडणूक अधिकारी नियुक्त केले. त्यानंतर घोषित केलेली निवडणूक अमान्य असल्याचे सांगत धनाजी यमकर यांनीही स्वतंत्रपणे निवडणूक कार्यक्रम जाहीर करत त्यांनीही निवडणूक अधिकारी नियुक्त केले होते. 

दोन्ही गटाकडून दावा केल्याने सभासदांमध्येही संभ्रम 

यामुळे अधिकृत निवडणूक कोणती यावरून संभ्रम निर्माण झाला होता. एकाच संस्थेच्या एका महिन्यात दोन निवडणुका तसेच दोन्ही बाजूंनी आमचीच निवडणूक अधिकृत असल्याचा दावा करत धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे एकमेकांविरोधात तक्रार केली होती. त्यावर सुनावणी होऊन धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दोन्ही बाजूंची निवडणूक बेकायदेशीर ठरवली होती. 

दरम्यान, चित्रपट महामंडळाची नवीन घटना अजून मंजूर झालेली नाही. त्यामुळे जुन्या घटनेनुसारच निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या तीन केंद्रांवर मतदान होईल. त्यात 18 हजार सभासद मतदानाचा हक्क बजावतील. 

गेल्या दीड वर्षांपासून निवडणूक नाही 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मुदत संपून दीड वर्षे झाली आहेत. कोरोना आणि महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणूक घेण्यात आली नव्हती. मुदत संपल्यानंतर कार्यकारिणीकडून मेघराज यांना बाजूला करत बहुमताने सुशांत शेलार यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. त्यामुळे वाद विकोपाला गेला होता. याचा महामंडळाच्या कामावरही परिणाम झाला होता.  

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget