कोल्हापूर:  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा यासाठी ओळखले जातात. नियम न पाळल्यामुळे अजित पवार यांनी बड्या-बड्या अधिकाऱ्यांना फटकारल्याचे किस्से यापूर्वीदेखील चर्चेत आले आहेत. याची प्रचिती पुन्हा एकदा कोल्हापुरात (Kolhapur News) आली आहे.  कामाच्या बाबतीत अजित पवार हे आग्रही असतात. त्यात कुचराई करणा-यांना ते नेहमी धारेवर धरत असतात. आजही त्यांनी वेळेवर न येणाऱ्या अधिकाऱ्याला वेळेची आठवण करून दिली आहे.  


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तालमींना मदत करण्याचं धोरण जाहीर केलंय. त्यामुळे तालमीची  परिस्थिती पाहण्यासाठी ते आज कोल्हापुरातील गंगावेस तालमीला भेट दिली. महाराष्ट्र केसरी ठरलेल्या सिकंदर शेख यांनी याच तालमीतून सराव केला होता... त्यामुळे पैलवान कोणत्या परिस्थितीमध्ये सराव करतात याचा आढावा अजितदादांनी घेतला. दरम्यान अनुपस्थित असलेल्या क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून अजितदादांनी तातडीने त्यांना  तालमीत येण्याची सूचना केली.


अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर


आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. अजित पवारांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर विविध कामांचा लोकार्पण सोहळा होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठक घेणार आहेत


अजित पवार नेहमीच अॅक्शन मोडवर


कोल्हापुरात उपमुख्यमंत्री  अजित पवार आज नेहमीप्रमाणे ॲक्शन मोडवर दिसले. तालमीची  परिस्थिती पाहण्यासाठी अजित पवार तालमीत गेले मात्र  क्रीडा अधिकारी घरीच होते.  गंगावेश तालमीतील पाहणीनंतर अजित पवारांनी तातडीने अधिकाऱ्यांना फोन केला. अजित पवार यांनी सकाळ  PWD अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने येण्याची तालमीत येण्याची केली सूचना केली.


अजित पवार त्यांच्या परखड स्वभावासाठी प्रसिद्ध


अजित पवार म्हणाले, अहो कुठे आहात तुम्ही अजित बोलतोय, तुम्ही कुठे आहात आता? तालमीत कधी येणार आहे? लवकर शिस्तीत या....


राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार त्यांच्या परखड स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांच्या सडेतोड शब्दात ते उत्तरे देत असतात. कामाच्या बाबतीत अजित पवार हे आग्रही असतात. त्यात कुचराई करणा-यांना ते नेहमी धारेवर धरत असतात.  



हे ही वाचा :


Parth Pawar : अतिशय चुकीचं, पार्थ पवार- गजा मारणे भेटीवर अजित पवार यांची बेधडक प्रतिक्रिया