कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशहितासाठी केलेल्या योजना महत्वाच्या आहेत, त्यामुळे त्यांना जननायक ही पदवी देणं योग्यच असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
1 हजार कोटींचा आराखडा तयार
दरम्यान, श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाईम मंदिर परिसराचा विकास करायचा असून एक हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी मंदिर परिसरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुश्रीफ यांनी दिले. 29 जानेवारी रोजी अजित पवार यांच्यासमोर आरखाड्याचे सादरीकरण केलं जाणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा
मुश्रीफ यांनी मनोज जरांगे यांच्या सुरु असलेल्या आंदोलनावरही भाष्य केले. ते म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारने अनेक पाउलं उचलली आहेत. कुणबी नोंदी दिवस रात्र काम करून शोधून काढल्या आहेत. 8 दिवसांत सर्व्हेक्षण करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा. सर्व्हेक्षणमधील त्रुटी मागासवर्गीय आयोगाला दाखवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या