Kolhapur Nagarpalika Election 2022 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण अल्प आहे, अशा राज्यातील 92 नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुकांच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांचा समावेश आहे. यामध्ये जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड आणि कुरूंदवाड या 6 नगरपालिकांचा त्यामध्ये समावेश आहे.या नगरपालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.
तथापि, राज्य सरकार ओबीसी आरक्षणासाठी शिंदे सरकार निवडणूक पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणुका घ्यायच्या की राज्य सरकारचा विनंती मान्य करून निवडणुका पुढे ढकलायच्या याबाबत आता निवडणूक आयोग द्विधा मनस्थितीत आहे. दुसरीकडे भाजपने पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड करावी, अशी मागणी केल्याने याबाबत काय निर्णय होणार? याकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात 6 नगरपालिकांसाठी रणधुमाळी सुरु
जिल्ह्यातील जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड आणि कुरूंदवाड या सहा नगरपालिकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. 18 ऑगस्ट रोजी मतदान, तर १९ ऑगस्टली मतमोजणी होणार आहे. दरम्यान, 22 ते 28 जुलै यादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
29 जुलैला अर्जांची छाननी होणार आहे. 4 ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक आयोग चिन्हवाटप करणार आहे. 4 ते 18 असा 14 दिवसांचा कालावधी उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी मिळेल.
नगराध्यक्ष निवड निर्णयाकडे लक्ष
देवेंद्र फडणवीस सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड करण्याची पद्धत आणली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय रद्द केला होता. आता सत्तांतर झाल्याने भाजपच्या गोटातून पुन्हा एकदा जनतेतून नगराध्यक्ष निवडीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नेमकी काय परिस्थिती असेल? त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणाचे काय होणार? याकडे स्थानिक नेत्यांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक कार्यक्रम असा असेल
- अर्ज दाखल करणे 22 ते 28 जुलै
- अर्ज छाननी : 29 जुलै
- अर्ज मागे घेण्याची मुदत : 4 ऑगस्ट
- अपील असल्यास 8 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे
- मतदान 18 ऑगस्ट
- मतमोजणी 19 ऑगस्ट
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार
- Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर ज्या चंद्रकांतदादांना हिमालयात पाठवू, पाठीत खंजीर खूपसला म्हणत होते, तेच आता एकाच फलकावर झळकले!
- Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महापालिकेची अंतिम मतदार यादी 16 जुलैला प्रसिद्ध होणार
- Rajesh Kshirsagar : शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर म्हणतात, चंद्रकांत पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे नेते