एक्स्प्लोर

Kolhapur Crime : इचलकरंजी पंचगंगा नदी पात्रात पोतं भरुन आधार कार्ड सापडल्याचा भांडाफोड लवकरच होणार

कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये 12 फेब्रुवारी रोजी (Ichalkaranji Aadhaar Card) नदी पात्राची स्वच्छता करताना तब्बल पोतं भरुन आधार कार्ड सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

Kolhapur News : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये 12 फेब्रुवारी रोजी (Ichalkaranji Aadhaar Card) नदी पात्राची स्वच्छता करताना तब्बल पोतं भरुन आधार कार्ड सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी सापडलेल्या पोत्यातील आधार कार्डचा पंचनामा केला आहे. या संदर्भातील पोलिसांनी अंतिम अहवाल अप्पर तहसील कार्यालयाकडे पाठवला आहे. इचलकरंजी, कबनूर आणि हुपरी भागाच्या मंडल अधिकाऱ्यांकडे आधारकार्ड व त्याची यादी संजय गांधी निराधार कार्यालयात पाठवण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा भांडाफोड होणार आहे. 

पंचगंगा नदीपात्रात प्लास्टिकच्या पोत्यात आधारकार्डचा मोठा ढीग मिळाला होता. स्वच्छता करणाऱ्या स्वयंसेवकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोत्यासह सर्व आधारकार्ड जप्त करण्यात आली होती. पंचनामा करून एकूण 206 आधारकार्ड पोलिसांनी अप्पर तहसील कार्यालयाकडे जमा केली आहेत. यामध्ये सर्वाधिक आधारकार्ड इचलकरंजी आणि कबनूर विभागातील आहेत. मंडल कार्यालयाकडून प्रत्येक आधारकार्डधारक व्यक्तीचा लेखी जबाब घेण्याचे काम सुरू आहे. बनावट आधारकार्डचा तपास सुरू झाल्यापासून या भागातील संजय गांधी निराधार समितीचे कामे करणारी एजंट सध्या नॉट रिचेबल झाले आहेत. तसेच पेन्शन मंजुरीचे ऑनलाईन कामे चालणारी दोन महा सेवा केंद्रही त्या दिवसापासून बंद आहेत. 

दीड महिन्यांमध्येच हजारो रेशन कार्डचा ढीग सापडल्यानंतर आधारकार्डही सापडल्याने इचलकरंजीमध्ये मोठं रॅकेट आहे का? याची चर्चा सुरु आहे. आधार कार्डवरील बहुतांश नागरिकांचे वय साधारण 60 ते 65 वयापर्यंत आहे. त्यामुळे पेन्शन मंजुरीच्या हेतूने आधार कार्डवर वय वाढवण्याचे प्रकारही सुरु आहेत. त्यासाठी हा प्रकार सुरु आहे का? अशीही चर्चा आहे. पंचगंगा नदी पात्रात स्वच्छता करत असताना राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना पोतं तरंगताना दिसल्याने बाहेर काढले होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नदीत सापडल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली होती. 

बनावट आधार कार्डने अल्पवयीन मुलीची प्रसुती 

दरम्यान, कोल्हापुरातील कसबा बावड्यात झालेल्या प्रसूतीमध्ये मुलीच्या पालकांनी बोगस आधार कार्डचा वापर करून प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाईल्ड लाईन तसेच जिल्हा महिला व बालकल्याण विकास विभागाने उघडकीस आणला. ही मुलगी सध्या 15 वर्षे 7 महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी ती मुलगी साडेतेरा वर्षाची असताना तिचा विवाह झाल्याचे समोर आलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Embed widget