Kolhapur Crime : अवघ्या 30 वर्षीय डॉक्टर तरुणीने स्वत:च इंजेक्शनचा ओव्हर डोस घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे (वय 30) नाव असून तिचे वडीलही डॉक्टर आहेत.
कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्कातील डी मार्टजवळ तिचा मृतदेह आढळून आला. तिने आत्महत्या का केली? याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही. डॉक्टर तरुणीने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याने हेंद्रे कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
डॉक्टर अपूर्वा कसबा बावड्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. शनिवारी रात्री त्यांनी मैत्रिणींसमवेत पार्टी केली होती. पार्टी करून झाल्यानंतर मध्यरात्री घरी परतल्या होता. मात्र, मध्यरात्रीच घरात कोणालाही माहिती न देता त्या घरातून बाहेर पडल्या. त्यामुळे कुटुबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, काहीच थांगपत्ता न लागल्याने काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी मध्यरात्रीच शाहूपुरी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या मदतीने कुटुंबीयांचा पहाटेपर्यंत शोध सुरू असतानाच घराजवळील डी मार्ट जवळील रिक्षा स्टॉपला लागून असलेल्या फुटपाथवर डॉ. अपूर्वा बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्याच ठिकाणी पोलिसांना इंजेक्शनची वापरलेली कुपी तसेच सिरीज आढळून आली. वडिलांनी तत्काळ त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले, पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद शाहुपूरी पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur 6 Nagarpalika Election 2022 : कोल्हापूर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांसाठी रणधुमाळी सुरु, पण लक्ष लागले नगराध्यक्ष निवड आणि ओबीसी आरक्षणाकडे
- Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार
- Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर ज्या चंद्रकांतदादांना हिमालयात पाठवू, पाठीत खंजीर खूपसला म्हणत होते, तेच आता एकाच फलकावर झळकले!
- Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महापालिकेची अंतिम मतदार यादी 16 जुलैला प्रसिद्ध होणार
- Rajesh Kshirsagar : शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर म्हणतात, चंद्रकांत पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे नेते