एक्स्प्लोर

Kolhapur Crime : कोल्हापुरात हुल्लडबाजांकडून साडे तीन लाखांवर दंड वसूल, 641 जणांची रस्त्यावर उतरवली!

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांना पहिल्याच दिवशी चांगलाच धडा दिला. पोलिसांनी दणकून कारवाई करताना एका दिवसात पोलिसांनी 641 वाहनचालकांकडून 3 लाख 34 हजारांवर दंड वसूल केला.

Kolhapur Crime : नव्या वर्षात स्वागत करताना हुल्लडबाजी, अवैध मद्यविक्री, जुगारी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांना पहिल्याच दिवशी चांगलाच धडा दिला. पोलिसांनी दणकून कारवाई करताना एका दिवसात पोलिसांनी 641 वाहनचालकांकडून 3 लाख 34 हजारांवर दंड वसूल केला. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 25 चालकांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 633 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 3 लाख 34 हजारांवर दंड वसूल केला. जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी वाहनांची तपासणीही केली.

कोल्हापूर शहर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी

एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून 1 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली. यंदा पोलिसांनी 31 डिसेंबरला संपूर्ण जिल्ह्यातच कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शहरात येणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहनांची कसून तपासणी केली जात होती; तर शहरातही चौकाचौकांत पोलिसांनी थांबवून कारवाई केली. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिस सतर्क होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणमार्फत ही कारवाई करण्यात आली. थर्टी फर्स्टला कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर पोलिस दलामार्फत यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. शहर, जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. मद्यधुंद अवस्थेत वाहने पळविणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करून 25 वाहने जप्त केली आहेत. 

काल दिवसभर आणि आज पहाटेपर्यंत हुल्लडबाजांवर कारवाया सुरू होत्या. वर्षअखेरीस पोलिसांनी अवैध मद्यविक्री करणाऱ्या सहा ठिकाणी छापे टाकून 7 संशयितांवर गुन्हा दाखल केला. 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन जुगार अड्ड्यांवरील कारवाईत 56 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळाला. दरम्यान, पोलिसांनी शहरानजीक काही फार्म हाऊसवरही झाडाझडती करत अवैध मद्याची चौकशी केली. त्यामुळे शहराजवळील ग्रामीण भागातही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मध्यरात्रीनंतर रस्त्यावर उतरून जल्लोष करणाऱ्या नागरिकांनाही त्यांनी हटकले. त्यामुळे मध्यरात्रीनंतर सर्वत्र शांतता होती.

दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात 6 ठिकाणांवर तपासणी नाके उभे करण्यात आले होते. गोव्यातून थर्टी फर्स्टच्या जल्लोषासाठी दारू तस्करी होण्याची शक्यता असल्याने सीमाभागात तपासणी नाके उभारण्यात आले होते. कागल चेकपोस्ट, चंदगडमध्ये तिलारी, आजरा रोडवरील गौसे तिट्टा, गगनबावडा येथे करूळ घाटात, राधानगरी येथे अभयारण्याजवळ फेजिवडे परिसरात आणि शाहूवाडीत आंबा घाटात पथके तैनात असतील. प्रत्येक वाहनाची चौकशी करण्यात आली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: मुख्यमंत्री फडणवीसांनी बेळगावात कन्नडमध्ये बोलून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळलं; सीमाभागातील माणसांचा अपमान; सतेज पाटलांचा हल्लाबोल; डिलिमिटेशन विधेयकावरूनही टीका
मुख्यमंत्री फडणवीसांनी बेळगावात कन्नडमध्ये बोलून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळलं; सीमाभागातील माणसांचा अपमान; सतेज पाटलांचा हल्लाबोल; डिलिमिटेशन विधेयकावरूनही टीका
Delimitation Bill : सतेज पाटलांनी राहुल गांधी यांना फोन करुन डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा द्यायला सांगावा, हसन मुश्रीफांचा टोला
सतेज पाटलांनी राहुल गांधी यांना फोन करुन डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा द्यायला सांगावा, हसन मुश्रीफांचा टोला
Raju Shetti:'वडेट्टीवार यांनी जो आरोप केलाय तो शरद पवारांचा इतिहासच'; विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर बोट ठेवत राजू शेट्टींनी डिवचलं, म्हणाले, अजितदादांच्या बाबतीत..
'वडेट्टीवार यांनी जो आरोप केलाय तो शरद पवारांचा इतिहासच'; विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर बोट ठेवत राजू शेट्टींनी डिवचलं, म्हणाले, अजितदादांच्या बाबतीत..
Kolhapur GBS Death Cases: धक्कादायक! कोल्हापूरच्या कळंब्यात दुर्मीळ 'जीबीएस' आजारामुळे 11 वर्षीय शाळकरी मुलाच्या मृत्यू, सात संशयित रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्टवर,नेमका आजार काय?
धक्कादायक! कोल्हापूरच्या कळंब्यात दुर्मीळ 'जीबीएस' आजारामुळे 11 वर्षीय शाळकरी मुलाच्या मृत्यू, सात संशयित रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्टवर,नेमका आजार काय?

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget