Kagal Triple Murder Case : कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील चारित्र्याच्या संशयावरून निर्दयी बापाने कुटूंब खून करून संपवल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. संशयित आरोपी प्रकाश माळी याने पत्नी गायत्री (35), मुलगी आदिती (17) व मुलगा कृष्णा (13) अशा तिघांचा मंगळवारी दुपारपासून संध्याकाळपर्यंत तिघांचा खून केला. त्यानंतर पोलिस स्टेशनला स्वत: हजर झाला. दरम्यान, या प्रकरणात आता संशयित प्रकाश माळीची पत्नी गायत्रीच्या भावाने मालमत्तेतील हिश्श्यासाठी गायत्रीचा छळ झाल्याचे म्हटले आहे. संशयित प्रकाश माळीसह त्याचा भाऊ, भावजय आणि चुलती यांनी गायत्रीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद गायत्रीचा भाऊ प्रकाश शंकर माळी (रा. तळंदगे, ता. हातकणंगले) याने दिल्याने संशयित आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे.
गायत्रीच्या भावाने संशयित प्रकाश धोंडिराम माळी तसेच भाऊ अमोल धोंडिराम माळी (45), त्याची पत्नी अंजना अमोल माळी (40) आणि चुलती शारदा सुरेश माळी (सर्व रा. कोष्टी गल्ली, कागल) यांचा समावेश आहे. हे मालमत्तेच्या हिश्श्यासाठी आपल्या बहिणीचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. याच कारणातून बहीण गायत्री, भाची आदिती व भाचा कृष्णात यांचा खून करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी
प्रकाश माळीला याला काल न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर कागल दिवाणी न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
थंड रक्ताने कुटूंबाला संपवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कागल शहरातील काळम्मावाडी वसाहतीजवळील ‘तापी’ घरकुलमध्ये आरोप प्रकाश पत्नी, मुलगा व मुलीसह राहत होता. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पत्नी कुणाशीतरी फोनवर बोलत असल्याचा राग मनात धरत प्रकाशचा पत्नी गायत्रीशी वाद झाला. या वादानंतर प्रकाशने तिचा गळा आवळून खून केला.
पत्नीचा खून करून तो तसाच बसून होता. त्यानंतर शाळेतून मुलगा आल्यानंतर त्याने आईला पाहून विचारले असता प्रकाशने दिव्यांग मुलगा कृष्णातचाही (वय 13) दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलगी आदिती (17) रात्री आठच्या सुमारास घरी आल्यानंतर प्रकाशने तो ओरडेल म्हणून तिलाही मारण्याचा प्रयत्न केला, यावेळी तिने मदतीसाठी आरडाओरड केला तेव्हा प्रकाशने तिच्या डोक्यातही वरवंटा मारला व त्यानंतर गळा आवळून खून केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या