Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये मंगळवारी एका 40 वर्षीय व्यक्तीने पत्नी, मुलगी आणि अपंग मुलाची हत्या केली. आरोपी प्रकाश माळी हा कागल पोलीस ठाण्यात आला आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली. पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेत आरोपीने निर्दयीपणे कुटूंब संपवल्याने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. त्याच्या कृतीने पोलिस हबकून गेले. 


प्रकाश एका कारखान्यात कामगार होता. त्याचा पत्नी गायत्रीबरोबर नेहमी वाद होत होता. दिव्यांग मुलगा कृष्णात आठवीत शिकत होता तर मुलगी आदिती अकरावीमध्ये शिकत होती. पत्नीचा खून केल्यानंतर मुलांचा सांभाळ कोण करणार? म्हणून त्याने मुलांचा सुद्धा खून केला. 


आरोपी प्रकाश माळीने पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचा गळा आवळून निर्घृण खून केला. कागलमधील काळम्मावाडी वसाहतीजवळील ‘तापी’ या तीन मजली घरकुलमध्ये हा प्रकार घडला. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर अधीक्षक तिरुपती काकडे घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांना तातडीने बोलावून घेतले. प्रकाशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


थंड रक्ताने हत्याकांड केल्यानंतर निर्दयी पती प्रकाश बाळासाहेब माळी (वय 42) रात्री नऊच्या सुमारास पत्नी, मुलगा आणि त्यानंतर मुलीला संपवून शांतपणे स्वतः पोलिस ठाण्यात हजर होत सारा प्रकार पोलिसांना सांगितला. ते ऐकताच पोलिसांची धावपळ उडाली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कागल शहरातील काळम्मावाडी वसाहतीजवळील ‘तापी’ घरकुलमध्ये आरोप प्रकाश पत्नी, मुलगा व मुलीसह राहत होता. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पत्नी कुणाशीतरी फोनवर बोलत असल्याचा राग मनात धरत प्रकाशचा पत्नी गायत्रीशी वाद झाला. या वादानंतर प्रकाशने तिचा गळा आवळून खून केला. 


पत्नीचा खून करून तो तसाच बसून होता. त्यानंतर शाळेतून मुलगा आल्यानंतर त्याने आईला पाहून विचारले असता प्रकाशने दिव्यांग मुलगा कृष्णातचाही (वय 13) दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर काही कालावधीनंतर मुलगी आदिती (17) रात्री आठच्या सुमारास घरी आल्यानंतर प्रकाशने तो ओरडेल म्हणून तिलाही मारण्याचा प्रयत्न केला, यावेळी तिने मदतीसाठी आरडाओरड केला तेव्हा प्रकाशने तिच्या डोक्यातही वरवंटा मारला व त्यानंतर गळा आवळून खून केला.


इतर महत्त्वाच्या बातम्या