एक्स्प्लोर

Uniform Civil Code: समान नागरी कायदा लवकरच येणार? केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे सूचक वक्तव्य

Jalana News: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नव्या संसद भवनाच्या इमारतीविषयी बोलताना विरोधकांना टोला लगावला आहे.

Jalana: नव्या संसद भवनासह देशातील 4 राज्यांत समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भाष्य केलं आहे. समान नागरी कायद्याचा मसुदा तयार होऊन जनतेसमोर ठेवला जाईल त्यावेळी त्यावर पुढील भाष्य केलं जाईल, असं दानवे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यातील बदनापूरमध्ये बोलत होते.

रविवारी (28 मे) नवीन संसदेचं उद्घाटन होत आहे आणि या सभागृहाचा प्रत्येकाने मान राखला पाहिजे, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली. नवीन संसदेच्या उद्घाटनाला विरोध करणं विरोधकांना शोभत नाही, पण विरोधक नवीन कुठला तरी मुद्दा काढून त्यावर चर्चा घडवून आणतात, असा टोलाही दानवे यांनी विरोधकांना लगावला आहे.

नवी दिल्लीत नव्या संसद भवनाची (Parliament  Building) भव्यदिव्य अशी इमारत उभारण्यात आली आहे, या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nrendra Modi) यांच्या हस्ते सकाळी करण्यात येईल. यासाठी संसद भवनात सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. होम-हवनापासून ते राजदंडाची प्रतिष्ठापना करण्यापर्यंतचे सर्व विधी या उद्घाटनाच्या वेळी करण्यात येणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. 

कसा असणार संपूर्ण सोहळा?

हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी सध्या दिल्लीमध्ये तयारी सुरु आहे. 28 मे रोजी सकाळी तमिळनाडूतील मठाचे 20 साधू-संत वैदिक विधींनुसार लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल म्हणजेच राजदंड लावतील. त्यानंतर सर्वधर्मीय प्रार्थना सभा करण्यात येईल. या सोहळ्याला शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित, संत उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सर्व धर्माचे गुरु सहभागी होणार आहेत.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील. तसेच उभसभापती हरिवंश हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन देखील करतील.  या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात राष्ट्रगीताने होईल. यावेळी नाणे आणि टपाल तिकीट देखील काढण्यात येणार आहे. तसेच यावेळी 75 रुपयांचे नाणे देखील काढण्यात येईल.  तर दुपारी अडीच या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. 

कशी आहे ही नवी इमारत?

ही संसदेची नवी इमारत चार मजली आहे तर या संसदेला सहा प्रवेशद्वार आहेत. या संसद भवनात लोकसभेचे एक हजार आणि राज्यसभेचे जवळपास 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात प्रत्येकासमोर छोटे बाक असतील. तसेच या बाकांमध्ये हजेरी,मतदान तसेच भाषांतर ऐकण्यासाठी आत्याधुनिक सुविधा असतील. याशिवाय या संसद भवनात 120 कार्यालयं आणि म्युझियम तसेच गॅलरीही असतील.

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget