Manoj Jarange on Ajit Pawar : सरकारी शिष्टमंडळ फुकटात चहा पिऊन गेलं; 20 रुपयांची पाण्याची बाटली, शुगर फ्री बिस्कीटांसाठी आमचे पैसे खर्च झाले, मनोज जरांगेंचं अजितदादांना प्रत्युत्तर

Manoj jarange Patil on Ajit Pawar : पवार साहेब टेबलाखाली लपू नका, खाली मान घालून बोलू नका, उगाच नाकातल्या नाकात गुणगुण करू नका, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

Continues below advertisement

Manoj jarange Patil on Ajit Pawar : 'शिष्टमंडळाने इथे येथून काय केले हे त्यांना विचारले का? शिष्टमंडळ आले आणि फुकटात चहा पिऊन गेले.  चहाची उधारी कोण देणार?' असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा पाचव्यांदा उपोषण सुरु केले असून आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे. 

Continues below advertisement

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पवार साहेब टेबलाखाली लपू नका, खाली मान घालून बोलू नका, उगाच नाकातल्या नाकात गुणगुण करू नका. शिष्टमंडळाने इथे येथून काय केले हे त्यांना विचारले का? शिष्टमंडळ आले आणि फुकटात चहा पिऊन गेले.  चहाची उधारी कोण देणार? त्यात त्यांना साखर असलेले बिस्कीट नको, खारे बिस्कीट हवे. कुठून आणायचे आम्ही? तुमची शुगर वाढते त्याला आम्ही काय करू? पाणी पिऊन गेले, 20 रुपयाला बाटली असते, त्याची उधारी कुठून द्यायची? शिष्टमंडळ नुसते येतात आणि माघारी जातात. अजित पवारांना केवळ शिष्टमंडळ दिसते, असे त्यांनी म्हटले. 

कशाला नाटकं करताहेत 

ते पुढे म्हणाले की,  शिष्टमंडळाने आतापर्यंत एकतरी केस मागे घेतली का? मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित केला का? सर्टिफिकेट व्हॅलिड केले नाहीत, म्हणजे जातीयवाद सुरु आहे की नाही? नोंदी शोधायचे का बंद केले? कशाला नाटकं करत आहात. 2004 साली सुशीलकुमार शिंदे सरकारने कायदा पारित केला, हे अजितदादांना दिसत नाही. 1994 साली आमचं 16 टक्के आरक्षण कशाला दिलं? हे अजितदादांना दिसत नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर संताप व्यक्त केला आहे.

जरांगेंचा दरेकरांवर हल्लाबोल 

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती. प्रवीण दरेकर यांनी म्हटलं होतं की, आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात, सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण आहे. जरांगे यातून बाहेर या. तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत, अशी टीका त्यांनी मनोज जरांगेंवर केली होती. यावरून मनोज जरांगे यांनी म्हटले की, प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाचा अपमान केलाय. आता गर्दी काय असते ते तुम्हाला मुंबईत दाखवू. दरेकर माझ्याभोवती असणाऱ्या मराठ्यांना आमिष दाखवत फोडत आहे. दरेकर वाटोळं करणारा माणूस आहे. देवेंद्र फडणवीस बस म्हणाले की, तिथं बस म्हणणारा हा माणूस आहे. त्याला मराठ्यांविषयी काही देणंघेणं नाही. काल ते लेकरू रडलं ते भंपकपणा वाटतं असं म्हणत मराठा समाजाचा अपमान केला आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटलांनी प्रवीण दरेकरांवर केला आहे. 

आणखी वाचा

Pravin Darekar: देवेंद्र फडणवीस माझे गुरु; मनोज जरांगेंच्या टीकेनंतर प्रवीण दरेकरांचं आक्रमक प्रत्युत्तर

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola