Mosambi Production In Jalna: उत्तर भारतात (North India) थंडीचा कडाका कमी होत असल्याने त्याचे परिणाम राज्यातील मोसंबीला उत्पादक (Mosambi Growers) शेतकऱ्यांना (Farmers) जाणवत आहे. कारण यामुळे जालन्याच्या मोसंबीला (Mosambi) डिमांड आलंय. तीन दिवसांपूर्वी 20 ते 22 हजार रुपये प्रतिटन भाव असलेली मोसंबी आज 26 ते 28 हजार रुपये टनापर्यंत गेलीय. विशेष म्हणजे जाणकारांच्या मते हे भाव येणाऱ्या काळात आणखी वाढू शकतात. साहजिकच यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी खूश झाले असून, मोसंबीला सोन्याचा दर मिळत आहे. 


कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे उत्तर भारत अक्षरशः गारठला होता. तर तापमानाचा पारा घसरल्याने तेथील मार्केट आणि वाहतूक दोन्हीही थंड झाले. त्याचप्रमाणे दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान सगळीकडे थंडीने दाट धुक्याची चादर पसरली होती. मात्र गेल्या काही दिवसात थंडी काहीशी ओसरून सूर्य दिसायला लागल्याने जालन्यातील मोसंबी मार्केटवर याचे परिणाम जाणवत आहे. तर त्यामुळे मोसंबीला आज 26 ते 28 हजार रुपये टनापर्यंत दर मिळाला आहे. एवढंच नाही तर जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या मोसंबी मार्केटमध्ये गेल्या तीन दिवसात मोसंबी भावात चार हजार रुपयांची वाढ झालीय.


गेल्या काही तीन दिवसांत मोठी दरवाढ! 


महाराष्ट्रातील जालना हा मोसंबीचा आगार समजला जातो. या मोसंबीला उत्तर भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात सारख्या राज्यामध्ये मोठी मागणी आहे. मात्र थंडीमुळे गेल्या काही दिवसात या राज्यातील बाजारावरती मोठा परिणाम जाणवत होता. याशिवाय मालवाहतूक ही ठप्प झाली होती. मात्र आता उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी होत असल्याने मोसंबी मार्केटला देखील डिमांड आले आहे. परिणामी तीन तीन दिवसांपूर्वी 20 ते 22 हजार रुपये प्रतिटन भाव असलेला मोसंबीचा दर आज 26 ते 28 हजार रुपये टनापर्यंत गेला आहे. 


आणखी दरवाढ होण्याची शक्यता! 


या काळात बाजारामध्ये मृग बहराची मोसंबी विक्री साठी बाजारात येते. महाराष्ट्रानंतर आंध्रप्रदेशमध्ये मोसंबीचे उत्पादन घेतलं जातं. मात्र आंध्रातील मोसंबी अद्याप मार्केटमध्ये यायला वेळ आहे. त्याचाच कुठेतरी जालन्याच्या मोसंबीला फायदा मिळतोय. त्यामुळे ही भाववाढ होत असून, थंडी आणखी कमी होत गेल्यास हे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसेच एकीकडे वाढत्या थंडीमुळे शेतातील अनेक पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. मात्र या संकटातून मोसंबी उत्पादक शेतकरी अगोदरच बाहेर आल्याने मृग बहराच्या या मोसंबीला चांगला भाव मिळत असल्याने काहीसा आनंदीत झालाय.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Agriculture News: घाटे अळीमुळे हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता; जालन्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली