Jalna Idol Theft Case : जालना जिल्ह्यातील (Jalna District) समर्थ रामदास यांचं (Samarth Ramdas) जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ गावात, श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेला 1 महिना 25 दिवस उलटूनही चोर अजूनही मोकाट आहेत. मूर्ती चोरणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून अथक प्रयत्न केले जात आहे. मात्र तरीही चोरटे काही हाती लागत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान चोरी गेलेल्या परिसरातील अंदाजे 20 विहिरीत गळ टाकून शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला. परंतु त्यात पथकाला यश आले नाही. त्यामुळे या मूर्ती चोरीचा तपास लावणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.


जालना जिल्ह्यातील समर्थ रामदास यांचं (Samarth Ramdas) जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ गावातील समर्थांच्या देवघरातील श्रीराम मंदिरातल्या राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न तसंच हनुमानाच्या मूर्ती 22 ऑगस्ट रोजी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला. तर जालना पोलिसांकडून वेगवेगळे पथक तयार करून आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र महिना उलटून सुद्धा पोलिसांना चोरट्यांना बेड्या ठोकण्यात यश काही मिळाले नसल्याचे पाहायला मिळत आहे. 


पोलिसांकडून या चोरांना पकडण्यासाठी सर्वच दिशने तपास केला जात आहे. दरम्यान शनिवारी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील चोरी गेलेल्या श्रीराम, लक्ष्मण, हनुमान व सिता या देवी, देवतांच्या मूर्तीचा परिसरातील अंदाजे 20 विहिरीत गळ टाकून शोध घेतला. परंतु त्यातही पोलीस पथकाला यश आले नाही. त्यामुळे आता पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 


पोलिसांकडून दोन लाखांचे बक्षीस जाहीर...


जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून चार मूर्ती चोरी झाल्याच्या घटनेला महिना उलटला आहे. मात्र, अद्यापही पोलिसांना मूर्तींचा किंवा चोरांचा शोध लागला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी चोरी झालेल्या मूर्तींची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. जालना जिल्हा पोलिसांनी यासाठी तब्बल 2 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मूर्तींसंदर्भात कोणतेही माहिती असल्यास याची माहिती नागरिकांनी पोलिसांना तत्काळ देण्याचे आवाहन जालना पोलिसांनी केले आहे.  


महत्वाच्या बातम्या...


समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला, 450 वर्षांपूर्वीच्या मूर्ती चोरीला, विधानसभेत पडसाद


Jalna News : देवा तुला शोधू कुठे? समर्थ रामदासांच्या देवघरातील प्राचीन मूर्ती चोरणारे अजूनही मोकाट