Jalna News: प्रजासत्ताक दिनी (Republic Day) आपल्या भाषणातून लोकशाहीची सहज आणि आपल्या आयुष्याची निगडित अशी व्याख्या करणाऱ्या जालना जिल्ह्यातील (Jalna District) 'भोऱ्या' उर्फ कार्तिक वजीरचा व्हिडिओ (Video) सर्वत्र व्हायरल झाला होता. दरम्यान 'एबीपी माझा'ने त्याचा शोध घेत त्याचे आयुष्य जगासमोर आणले होते. राज्यभरात चर्चेत आलेला याच कार्तिकच्या भाषणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनाही भुरळ घातली असून, त्यांनी आज जालना दौऱ्यादरम्यान त्याची भेट घेतली. तसेच आपल्या अतिशय घाईगडबडीच्या दौऱ्यात देखील त्यांनी कार्तिकचं भाषण पुन्हा एकदा ऐकले.


अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत आज जालन्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. दरम्यान आपल्या या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिक वजीरची भेट घेतली. तसेच त्याने शाळेत केलेलं भाषण देखील ऐकले. त्यामुळे कार्तिकच्या भाषणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भुरळ घातल्याची चर्चा पाहायला मिळाली.


कार्तिकचा भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


प्रजासत्ताक दिनी आपल्या भाषणातून लोकशाही समजवून सागणारा एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कोणाचा आहे याची चर्चा राज्यभरात सुरु होती. अशात 'एबीपी माझा'ने या मुलाचा शोध घेतला. अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील 'भोऱ्या' उर्फ कार्तिक वजीरचा हा व्हिडिओ असल्याचे समोर आले. कार्तिक हा गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेतो. दरम्यान त्याने प्रजासत्ताक दिनी शाळेत भाषण करताना लोकशाही आणि लोकशाहीतील स्वातंत्र्याची व्याख्या आपल्या अनोख्या अंदाजात आणि सोप्या भाषेत सांगितली होती. त्याच्या याच भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


कार्तिकच्या भाषणाची सर्वत्र चर्चा...


अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील 'भोऱ्या' उर्फ कार्तिक वजीरने प्रजासत्ताक दिनी आपल्या शाळेत केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे कार्तिकच्या या हटके भाषणाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. माजी मंत्री राजेश टोपे यांनी देखील त्याची भेट घेऊन, पुन्हा त्याचे भाषण ऐकले होते. तर त्याच्या या भाषणाचं सर्वत्र कौतुक देखील होत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Exclusive : लोकशाहीची भन्नाट व्याख्या सांगणारा चिमुकला आहे तरी कोण? भाषण ऐकून पोट धरून हसाल