Jalna News: मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या जालन्यातील क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency) प्रकरणातील प्रमोटर किरण खरात आणि त्यांची पत्नी दिप्ती खरात यांना धमकावण्यासह किरण खरात यांना किडनॅप करण्याच्या प्रकरणात आठ संशियत आरोपींवरुद्ध कदीम ठाण्यात 16 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता या आठही संशयित आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या सर्व आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तो अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत अधिका माहिती अशी की, जीडीसी या अभासी चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगून जीडीसी कंपनीचा प्रमोटर म्हणून वावरणाऱ्या किरण खरात यांच्या सांगण्यावरून जिल्ह्यातील हजारों गोरगरीब तसेच श्रीमंतांनी यात पैसे गुंतवविले होते. हा जीडीसी कॉइन 25 डिसेंबर 2022 रोजी खुल्या बाजारात येणार असल्याचे गुंतवणूदारांना सांगण्यात आले होते. परंतु तो त्या दिवशी लाँच झाला नाही. त्यामुळे जीडीसी कॉइनचे दर हे धाडकन कोसाळे. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांच्या आशेवर पाणी फेरले. त्यामुळे याप्रकरणी गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान मंगळवारी जालना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. देव यांच्या न्यायालयात या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. या प्रकरणातील संशयितांना अटकपूर्व जमीन मिळू नये, अशी मागणी पोलिसांच्या वतीने न्यायालयाकडे केली होती; परंतु ती मान्य करण्यात आली नाही.
अर्जुन खोताकारांच्या जावयावर देखील गुन्हा दाखल...
या सर्व प्रकरणात प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यासह त्यांचे भाऊ विक्रम झोल यांनीही किरण खरात यांच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक केल. परंतु, नंतर या कॉइनचे दर कोसळल्याने अपेक्षित वाढीव पैसे मिळणे तर सोडाच, मूळ गुंतवणूकही धोक्यात आल्याच्या कारणावरून विजय झोल व त्यांच्या साथीदारांनी किरण खरात यांना पुणे येथून किडनॅप करून प्रथम औरंगाबादेतील एका हॉटेलमध्ये आणि नंतर त्यांच्या जालन्यातील घरात डांबून ठेवल्याचा आरोप किरण खरात यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केला आहे. त्यावरूनच विजय झोल, विक्रम झोल, सुभाष काकस, अनिरुद्ध शेळके, विजय भांदरगे, सुमित जाधव, गजानन तौर यांच्या विरुद्ध 16 जानेवारीला प्रथम घनसावंगी ठाण्यात गुन्हा नोंद होऊन नंतर तो जालन्यातील कदीम ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता.
राजकीय आरोपही झाले...
अर्जुन खोतकर यांच्या जावयाचे या प्रकरणात नाव आल्याने साहजिकच यावरून राजकारण झाले. या सर्व प्रकरणात काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर आरोप करत गंभीर आरोप केले. या सर्व घोटाळ्यात खोतकर यांचा थेटसंबध असल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला उत्तर देताना खोतकर यांनी देखील गोरंट्याल यांच्यावर आरोप केले होते. क्रिप्टो करन्सी प्रकरणातील आरोपींना गोरंट्याल यांनी मदत केल्याचा आरोप खोतकर यांनी केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Jalna News: जालन्यातील 'क्रिप्टो' घोटाळ्याची व्याप्ती वाढली, आतापर्यंत 103 तक्रारी दाखल