Jalna Marathwada steel company Raid: जालना जिल्ह्यातील स्टील कंपन्यांवर आयकर खात्याच्या (Income Tax Department) कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली असून, देशभरात याची चर्चा पाहायला मिळत आहे. तब्बल 400 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने सलग आठ दिवस केलेल्या कारवाईत तब्बल 390 कोटींचं घबाड हाती लागलं आहे. मात्र जालन्यातील स्टील कंपन्या, डिलर्स आणि अन्य व्यावसायिकांवर कारवाईची ही पहिली वेळ नाही. कारण गेल्यावर्षी म्हणजेच सप्टेंबर 2021  मध्ये सुद्धा जालन्यातील चार कंपनांच्या 32 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी सुद्धा तब्बल 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर आली होती. 


आयकर विभागाने 27  सप्टेंबर 2021 जालना जिल्ह्यातील चार प्रमुख स्टील कंपन्यांवर छापेमारी केली होती. या स्टील कपंन्यांनी स्टील भंगार आणि उत्पादन नोंदीमध्ये घोळ घालून बनावट कंपन्यांच्या  नावाने कोट्यवधीचे व्यवहार केल्याचे समोर आले होते. त्यावेळी या कंपन्यांवर कारवाई करतांना आयकर विभागाने त्यांच्या औरंगाबाद, पुणे, मुंबई व कोलकता येथील अशा एकूण 32  ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले होते. 


त्यावेळी सुद्धा 300 कोटींच्या नोंदी...


जालना आणि औरंगाबाद येथे आयकर विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 390 कोटींचं घबाड पथकाच्या हाती लागलं आहे. मात्र गेल्यावेळी सुद्धा आयकर विभागाने केलेल्या कारवाईत 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ता पथकाच्या हाती लागली होती. सुरवातीला ही बेहिशेबी संपत्ती आणि व्यवहाराची रक्कम अंदाजे 200 कोटींच्या घरात असावी असा आयकर विभागातील अधिकाऱ्यांना वाटले होते. मात्र प्रत्यक्षात कारवाईनंतर आणखी 100 कोटी रुपये वाढेल होते. त्यामुळे या सर्व कारवाईनंतर जालना म्हणजे 'सोने का पालना' असे उगाच म्हंटले जात नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 


गाड्यांवर 'राहुल weds अंजली'चे बोर्ड; इनकम टॅक्सचं वऱ्हाड करचुकव्यांच्या घरात, जालन्यातील धाडीमागची फिल्मीस्टाईल कहाणी


पैसे मोजता-मोजता अधिकरी आजारी पडले...


जालना जिल्ह्यात आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर आली आहे. मात्र एवढा मोठा मुद्देमाल आणि त्यातील रोख रक्कम मोजण्यासाठी पथकाला मोठी कसरत करावी लागली आहे. संपूर्ण कारवाईसाठी तब्बल आठ दिवस लागले. विशेष म्हणजे या आठ दिवसात सलग दिवस-रात्र कारवाई सुरु होती. त्यामुळे कारवाईसाठी गेलेले काही अधिकारी आजारी पडले असल्याचे सुद्धा समोर आले आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: जालन्यातील 390 कोटींच्या घबाडाचं औरंगाबाद कनेक्शन


Jalna Raid : जालन्यामधील स्टील उद्योजकांवरील धाडीची देशभर चर्चा; जालन्यातील स्टील उद्योग किती मोठा?